पनवेल : एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून खारघर शहर उदयास येते आहे. देशातील अनेक शहरांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विकास करण्यात येत आहे, त्यासाठी शासकीय स्तरावर विविध योजना राबविण्यात येत असून डिजीटल इंडियासाठी प्रयत्न सुरू आहेत.सिडकोने यासंदर्भात विचार करुन शहरात वाय फाय झोन उभारावे अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या नेत्रा किरण पाटील यांनी केली आहे. त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले आहे. खारघर शहर हे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असून मुंबई, ठाण्याबरोबरच इतर राज्यांतील मुलेही याठिकाणी शिक्षणासाठी येतात. सेंट्रल पार्क, हिरांनदानी कॉम्प्लेक्स, खारघर रेल्वे स्थानक, उत्सव चौक, चौक शिल्प, नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे सिडकोमार्फत मोफत वाय -फाय सुविधा सुरू करण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
खारघरमध्ये मोफत वायफायची मागणी
By admin | Published: January 14, 2017 7:09 AM