तरुणी पालकांच्या स्वाधीन
By admin | Published: November 7, 2016 03:01 AM2016-11-07T03:01:16+5:302016-11-07T03:01:16+5:30
कोकणाकडून रेल्वेने मुंबईकडे जाणारी एक २० - २२ वर्षीय तरु णी अनावधानाने कासू किंवा पेण स्थानकावर उतरून महामार्गावरून चालत कोलेटी गावात आली होती.
नागोठणे : कोकणाकडून रेल्वेने मुंबईकडे जाणारी एक २० - २२ वर्षीय तरुणी अनावधानाने कासू किंवा पेण स्थानकावर उतरून महामार्गावरून चालत कोलेटी गावात आली होती. याबाबत स्थानिकांनी बीट मार्शलला माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने कार्यवाही करीत त्या तरु णीला नागोठणे पोलीस ठाण्यात आणून दोनच दिवसात तिच्या पालकांचा शोध घेवून त्यांच्या स्वाधीन के ले.
राजापूर तालुक्यातील कोदिवली गावची एक तरु णी कफ परेड येथे कामाला असून काही कामानिमित्त ती कोकणात आपल्या घरी आली होती. ही तरु णी ३१ आॅक्टोबरला कोकण रेल्वेने मुंबईकडे परतत असताना ती कासू किंवा पेण या स्थानकावर अनावधानाने उतरली होती. तरु णीचे काही अंशी मानसिक संतुलन बिघडल्याने ती पुन्हा चालत माघारी फिरली व नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलेटी गावात आली. तिने दोन दिवस या गावातच ठिय्या मांडला होता. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याचे बीटमार्शल किरण पाटील आणि आंबेतकर यांना कळविल्यानंतर त्यांनी तातडीने तेथे जावून तिची चौकशी केली. चौकशीत तरु णी असंबद्ध बरळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिला पुढील चौकशीसाठी नागोठणे पोलीस ठाण्यात आणले.
तरु णीने फक्त आपले व गावचेच नाव सांगितल्याने पोलिसांनी हा धागा पकडत पो. नि. संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू केला. याबाबत राजापूर आणि कफ परेड येथील पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला असता, राजापूर तालुक्यातील कोदिवली गावातील एक तरु णी मुंबईकडे जात असताना ती बेपत्ता झाली असल्याचे स्पष्ट झाले. या
तरु णीच्या नातेवाइकांना तातडीने नागोठणे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविल्यानंतर ही आपलीच मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्याने तिला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. पो. नि. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शलने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)