शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

ट्रॅव्हल्समधील मालवाहतूक ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 1:09 AM

नियमांना बगल

नवी मुंबई : खासगी ट्रॅव्हल्समधून अवैधरीत्या होत असलेल्या मालवाहतुकीमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. यानंतरही उघडपणे ट्रॅव्हल्समधून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक होत आहे. अशा ट्रॅव्हल्सवरील कारवाईकडे आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

राज्याच्या अनेक भागांतील प्रवाशांसाठी चालविल्या जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे जाळे मुंबईसह ठाणे व नवी मुंबईला जोडले गेलेले आहे. त्यानुसार नवी मुंबईतून दररोज शेकडो ट्रॅव्हल्स ये-जा करतात. लॉकडाऊनमध्ये ट्रॅव्हल्सला लागलेला ब्रेक आता अनलॉकमध्ये हटला आहे. परंतु प्रवासी वाहतुकीला परवानगी असताना बहुतांश ट्रॅव्हल्स कुरियरच्या सामानाची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जात आहेत. ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत होणारा खर्च टाळण्यासाठी स्वस्तात ट्रॅव्हल्समधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत मालवाहतूक करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी खासगी ट्रॅव्हल्समधून मालवाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. परिणामी, प्रवाशांवर मृत्यूची टांगती तलवार लटकत आहे. अशाच प्रकरणातून शनिवारी ३५ प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. आकांक्षा ट्रॅव्हल्सची बस मुंबईकडे येत असताना सानपाडा येथे बसला आग लागली. बसमधील कुरियरचे साहित्य उतरविले जात असताना ही दुर्घटना घडली. घटनेवेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते, त्यापैकी एकाला दुखापत झाली आहे. तर बस थांबलेली असल्याने प्रवाशांनी तत्काळ बाहेर पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले.बसला लागलेली आग विझविताना बसच्या डिक्कीत औषधे व इतर सामान असल्याचे आढळून आले. त्यात सॅनिटायझरचादेखील साठा होता असे समजते. त्यामुळेच क्षणांत संपूर्ण बस जळून खाक झाली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTravel Tipsट्रॅव्हल टिप्स