एमजेपीच्या जलवाहिनीला वारंवार फुटीचे ग्रहण

By Admin | Published: March 31, 2017 06:42 AM2017-03-31T06:42:53+5:302017-03-31T06:42:53+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला फुटीचे ग्रहण लागले आहे. कळंबोली परिसरात गुरु वारी वाहिनी फुटल्याने

The frequent split eclipse of MJP water channel | एमजेपीच्या जलवाहिनीला वारंवार फुटीचे ग्रहण

एमजेपीच्या जलवाहिनीला वारंवार फुटीचे ग्रहण

googlenewsNext

कळंबोली : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला फुटीचे ग्रहण लागले आहे. कळंबोली परिसरात गुरु वारी वाहिनी फुटल्याने वसाहतीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ही तिसरी घटना असल्याने रहिवासी त्रस्तआहेत. सिडको प्रशासन मात्र एमजेपीकडे बोट दाखवून नामानिराळे होत आहे.
एमजेपीची भोकरपाडा येथील जलशुद्धिकरण केंद्रातून सिडको वसाहतींना पाणीपुरवठा करणारी वाहिनी जीर्ण झालेली आहे. त्यामुळे जलवाहिनी फुटणे आणि लाखो लिटर पाणी वाया जाणे, ही बाब नित्याचीच झाली आहे. वारंवार वाहिनी फुटल्याने वसाहतींमध्ये पाणीटंचाई निर्माण होत आहे. सिडकोची स्वत:ची यंत्रणा नसल्याने एमजेपीवर तहान भागविण्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे. ही वाहिनी बदलण्यासाठी एमजेपीने सिडको, जेएनपीटी, पनवेल महापालिका या ग्राहक संस्थांकडे भागभांडवलाची मागणी केली होती. सिडकोने सुरु वातीला आपला हिस्सा देण्याकरिता संचालक बोर्डाच्या बैठकीत मंजुरी घेतली होती; परंतु महापालिका झाल्याने सिडकोने हात वर केले आहेत. त्यामुळे नवीन जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. वारंवार वाहिन्या फुटल्याने पनवेल शहरासह कळंबोली नवीन पनवेलला पाणी मागणीप्रमाणे देता येत नाही.

गुरु वारी कळंबोली परिसरात पुन्हा एमजेपीची वाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे दिवसभर पाणी आले नाही. परिणामी, कळंबोलीकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.कळंबोली जवळ एमजेपीची पाइप लाइन फुटली. त्यामुळे वसाहतीला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. संध्याकाळपर्यंत वाहिनी दुरु स्तीचे काम सुरू होते. शुक्र वारी वसाहतीत कमी दाबाचा पाणीपुरवठा करण्यात येईल. याबाबत आम्ही दवंडी दिली आहे.
- चंद्रहार सोनकुसरे,
सहायक कार्यकारी अभियंता,
सिडको

Web Title: The frequent split eclipse of MJP water channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.