शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

गॅस पाइपलाइनविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 7:05 AM

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि सरकार दुर्लक्ष करते तेव्हा अन्यायाविरोधात संघटित होऊन प्रतिकार केला जातो. अशीच परिस्थिती सध्या पेण तालुक्यातील दुष्मी, ठाकूरपाडा आणि खारपाडा येथील नागरिकांवर ओढवली आहे. नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही एचपीसीएल कंपनी आणि संबंधित ठेकेदार जाणूनबुजून लोकवस्तीमधून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम करत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे.

अलिबाग  - सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि सरकार दुर्लक्ष करते तेव्हा अन्यायाविरोधात संघटित होऊन प्रतिकार केला जातो. अशीच परिस्थिती सध्या पेण तालुक्यातील दुष्मी, ठाकूरपाडा आणि खारपाडा येथील नागरिकांवर ओढवली आहे. नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही एचपीसीएल कंपनी आणि संबंधित ठेकेदार जाणूनबुजून लोकवस्तीमधून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम करत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यातून मार्ग न काढल्यास पेण प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा गॅस पाइपलाइन हटाव कृती समितीने दिला आहे.कृती समितीचे निमंत्रक संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मोर्चाला पोलिसांनी हिराकोट तलाव परिसरात अटकाव केला. त्यानंतरच मोर्चाचे तेथेच सभेमध्ये रूपांतरझाले.एचपीसीएल कंपनीने उरण (भेंडखळ) ते शिक्रापूर-चाकण येथे गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले आहे. सुमारे एक फूट व्यासाची गॅस पाइपलाइन टाकण्यात येत आहे. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी-खारपाडा हद्दीतील दुष्मी, ठाकूरपाडा आणि खारपाडा गावातील लोकवस्तीमधून गॅस पाइपलाइन जात असल्याने नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. लोकवस्तीवगळून ही पाइपलाइन कोणत्या भागातून टाकावी यासाठी १९९९ साली सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र कंपनीने अचानकपणे आता गावातील लोकवस्तीमधूनच गॅस पाइपलाइन टाकण्यास सुरुवात केली आहे. एलपीजी गॅस हा ज्वलनशील असल्याने लिकेज झाल्यास पेट धरुन तेथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.या गॅस पाइपलाइनबाबत एचपीसीएल कंपनी, सरकारी कार्यालयाने नागरिकांना, बाधित शेतकºयांना विश्वासात नघेता कोणतीच माहिती दिलेलीनाही. गॅस पाइपलाइनला आमचा विरोध नाही, परंतु ती लोकवस्तीतून न टाकता पाताळगंगा नदी किनाºयावरुन म्हणजेच बाहेरुन टाकावी,अशी कृती समितीची प्रमुख मागणी आहे.याबाबत कंपनीसह ठेकेदार बाजीराव कालुंत्रे यांना वेळोवेळी सूचित केले असतानाही ठेकेदार कालुंत्रे हे मनमानी पध्दतीने आणि पोलीस बळाचा वापर करुन पाइपलाइन टाकण्याचे काम करीत आहेत. विरोध करणाºयांना त्यांच्याकडून धमकावण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.याची माहिती प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी ४ जानेवारी २०१८ रोजी प्रांत कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. सदरच्या बैठकीला आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पाटील, प्रतिमा पुदलवाड, पेण तहसीलदार अजय पाटणे, एचपीसीएल कंपनीचे वरिष्ठ अभियंता सोेमेश्वर धकाते, आकाश गोखले, मनीष कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस.आर. चव्हाण, ठेकेदार बाजीराव कालुंत्रे, दुष्मी-खारपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सरिता वाघे, सदस्य आणि ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समितीचे निवेदनकंपनीचा अन्याय कदापि सहन करणार नाही आणि लोकवस्तीतून पाइपलाइन टाकू दिली जाणार नाही, असा इशारा कृती समितीने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.ग्रामस्थांच्या मागणीसाठी १४ मार्चपासून पेण प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे कृती समितीने निवेदनात नमूद केले आहे.याप्रसंगी कृती समितीचे निमंत्रक संतोष ठाकूर, सरपंच सविता वाघे, प्रशांत घरत, हिरामण घरत, गंगाधर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.लोकवस्तीतून गॅस पाइपलाइनचे काम सुरू१आमदार पाटील यांनी बैठकीमध्ये ही पाइपलाइन पाताळगंगा नदी किनाºयावरुन नेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रांताधिकारी पुदलवाड यांनी कंपनीला काम थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर काही काळ काम थांबवण्यात आले होते, मात्र आता पुन्हा लोकवस्तीमधूनच गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु केल्याने नागरिकांमध्ये असंतोष उफाळून आला.२प्रशासनालाही जुमानत नसणाºया कंपनी आणि संबंधित ठेकेदाराविरोधात जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कृती समितीने जिल्हाधिकारी यांना २० फेब्रुवारी २०१८ रोजी केली होती, परंतु जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी कोणताही अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने मोर्चा काढावा लागल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई