पनवेल महापालिका मुख्यालयासमोर आदिवासींचे बेमुदत उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 05:23 AM2018-09-05T05:23:22+5:302018-09-05T05:23:41+5:30
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये भाजी विक्री व इतर व्यवसाय करणाऱ्या आदिवासींवर महापालिकेने कारवाई केली आहे. आश्वासन देऊनही नोकरीमध्ये समावेश करून घेतला जात नाही. या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासींनी महापालिका मुख्यालयासमोर उपोषण केले.
पनवेल : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये भाजी विक्री व इतर व्यवसाय करणाऱ्या आदिवासींवर महापालिकेने कारवाई केली आहे. आश्वासन देऊनही नोकरीमध्ये समावेश करून घेतला जात नाही. या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासींनी महापालिका मुख्यालयासमोर उपोषण केले.
आदिवासी विकास परिषदेच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आदिवासी महिला भाजीपाला, मासळी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. याशिवाय आदिवासींना नोकरीमध्ये समावेश करून घेण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. अतिक्रमण विभागाने आदिवासी फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडील भाजीपाला, फळे, तराजू व इतर
साहित्य जप्त केले आहेत. या अन्यायाविरोधात आदिवासींनी उपोषण सुरू केले.
महापालिका कार्यक्षेत्रामधील आदिवासींचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात यावे. प्रश्न सोडविले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. संघटनेचे नेते मदन गोवारी व बी. पी. लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.