नवी मुंबई : होळी व धूलिवंदनला सर्व बाजारपेठा बंद असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केट रविवारी होळी दिवशी सुरू ठेवण्यात आले होते. दिवसभरात ३६ हजार पेट्या आंब्याची आवक झाली. धूलिवंदनदिवशीही मुंबईकरांना सुरळीत भाजीपाला पोहोचविला असून, सोमवारी पहाटेपर्यंत १३१९ टन भाजीपाल्याची विक्री झाली होती.
मुंबई, नवी मुंबई परिसरामधील बहुतांश सर्व बाजारपेठा दोन दिवस बंद होत्या. होळी रविवारी असल्यामुळे व धूलिवंदनमुळे सोमवारीही सर्व मार्केट बंद होती. प्रत्येक विभागामधील दूध व रंगांची विक्री करणारे दुकाने वगळता इतर सर्व दुकानेही बंद होती. राज्यात सर्वत्र आंब्याचा हंगाम सुरू आहे. सलग दोन दिवस मार्केट बंद राहिल्यामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने रविवारी व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी दिली हाेती. होळीच्या दिवशी मार्केटमध्ये कोकणातून ३०६८१ पेट्या व इतर राज्यातून ६०५७ अशा एकूण ३६ हजार ७३८ पेट्या आंब्याची आवक झाली आहे. सोमवारी फळ मार्केट बंद ठेवण्यात आले होते.
भाजीपाला मार्केट धूलिवंदनच्या दिवशी सुरू ठेवले होते. रविवारी मध्यरात्री ते सोमवारी पहाटे ८ वाजेपर्यंत भाजीपाला मार्केटमध्ये १३१९ टन भाजीपाल्याची आवक झाली. यामध्ये २ लाख ५९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. सर्व भाजीपाल्याची पहाटेच विक्री झाली आहे. जवळपास सर्वच भाज्यांचे दरही कमी झाले असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
बाजार समितीमधील भाजीपाल्याचे प्रतिकिलो दरवस्तू - १८ मार्च - २५ मार्चभेंडी २० ते ४० - १७ ते २५दुधी भोपळा - २० ते २६ - १८ ते २२फरसबी - २२ ते २६ - २० ते ३५फ्लॉवर ८ ते १२ - १० ते १५गवार ३६ ते ५० - ४० ते ५०घेवडा २० ते २८ - १८ ते ३४कारली ३० ते ३६ - २० ते ३०कोबी १२ ते १८ - १० ते १५ढोबळी मिरची ४० ते ५० - २० ते ४०दोडका ३० ते ३६ - १५ ते २५वाटाणा ५० ते ६० - ३० ते ५०