प्रतिसादाअभावी बांधकाम व्यावसायिकांत निराशा; खरेदीकडे ग्राहकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 11:46 PM2019-10-29T23:46:05+5:302019-10-29T23:46:37+5:30

सिडकोच्या घर नोंदणीची गतीही मंदावली

Frustration at builders for lack of response; Consumer Lessons to Purchase | प्रतिसादाअभावी बांधकाम व्यावसायिकांत निराशा; खरेदीकडे ग्राहकांची पाठ

प्रतिसादाअभावी बांधकाम व्यावसायिकांत निराशा; खरेदीकडे ग्राहकांची पाठ

googlenewsNext

नवी मुंबई : दसऱ्यापाठोपाठ दिवाळीच्या मुहूर्तानेसुद्धा बांधकाम उद्योगाला हुलकावणी दिली. ग्राहकांनी घर खरेदीकडे पाठ फिरविल्याने रियल इस्टेट क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे सिडकोच्या घर नोंदणीलासुद्धा फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले आहे. मात्र सोने खरेदीला दसºयाच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

मात्र मागील काही वर्षांपासून रियल इस्टेट मार्केटला मरगळ चढली आहे. आता तर हे संपूर्ण क्षेत्र मंदीचा फटका बसल्याने आणि ग्राहकांनी मालमत्ता खरेदीकडे सपशेल पाठ फिरविल्याने रियल इस्टेटमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्या तुलनेत सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे शहरातील सराफांकडून सांगण्यात आले.

दिवाळीच्या दिवसांत बाजारात ग्राहकांची रेलचेल होती. सराफांची दुकाने सांयकाळनंतर ग्राहकांनी फुलून गेली होती. वाशी सेक्टर ९ येथील बहुतांशी सराफांची दुकाने मुहूर्तावर सजली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोने खरेदीवर अनेक दुकानदारांनी आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर भर
घरे आणि वाहने आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांनी दसºयाच्या मुहूर्तावर घरगुती वापाराच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या खरेदीला पसंती दिली. यात टीव्ही, साउंड सिस्टम, फ्रिज, वातानुकूलित यंत्र आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होता. विशेष म्हणजे संबंधित विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या होत्या. तसेच ठरावीक साहित्याच्या खरेदीवर विशेष सूट देऊ केली होती. याचा परिणाम म्हणून शहरातील दुकाने आणि मॉल्समध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.

फटाका विक्रेत्यांनाही मंदीचा फटका
रोशणाई आणि फटाक्यांशिवाय दिवाळीची मौज नाही. परंतु या वेळी ग्राहकांनी फटाक्यांच्या स्टॉल्सकडेसुद्धा पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यामुळे फटाका विक्रेत्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आर्थिक मंदीचे कारण पुढे केले जात असले तरी या वर्षी ऐन दिवाळीत पावसाची रिपरिप सुरू झाल्याने त्याचा परिणामसुद्धा फटाका विक्रीवर झाल्याचे सांगण्यात आले.

चार चाकी वाहन खरेदीकडे पाठ
देशातील आर्थिक घडामोडीचा सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसला आहे. त्यामुळे नवीन वाहने खरेदीबाबत ग्राहकांत फारसा उत्साह नसल्याचे दिसून आले. असे असले तरी दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. याचा परिणाम म्हणून शहरातील दुचाकीच्या बहुतांशी शोरूम्सबाहेर सकाळपासून खरेदीदारांची गर्दी दिसून आली.

Web Title: Frustration at builders for lack of response; Consumer Lessons to Purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.