कचऱ्यातून इंधन निर्मिती प्रकल्प सुरू

By admin | Published: February 1, 2016 01:42 AM2016-02-01T01:42:43+5:302016-02-01T01:42:43+5:30

‘टाकाऊतून टिकाऊ’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी कचऱ्यातून इंधन निर्मिती, जैविक खत तसेच गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाला सानपाड्यात सुरुवात झाली आहे

Fuel Production Project from the Trash | कचऱ्यातून इंधन निर्मिती प्रकल्प सुरू

कचऱ्यातून इंधन निर्मिती प्रकल्प सुरू

Next

प्राची सोनवणे ल्ल नवी मुंबई
‘टाकाऊतून टिकाऊ’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी कचऱ्यातून इंधन निर्मिती, जैविक खत तसेच गांडूळ खतनिर्मिती प्रकल्पाला सानपाड्यात सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ओला कचरा, निर्माल्य, झाडाचा पालापाचोळा या अशा टाकाऊ कचऱ्यातून खत आणि इंधन तयार केले जाणार आहे. परिसरातील नागरिकांना प्रकल्पाचा लाभ घेता येणार, हरित नवी मुंबई प्रकल्पालाही हातभार लावला जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आणि निसर्गप्रेमी फाऊंडेशनच्या वतीने सानपाडा परिसरातील पर्यावरणस्नेहींनी एकत्र येऊन या प्रकल्पाला सुरुवात केली असून गेली १० वर्षे या संघाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहे. महापौर सुधाकर सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करुन टाकाऊतून टिकाऊ या प्रकल्पाला खरी सुरुवात झाली आहे. सानपाडा रेल्वे स्थानकालगत असलेल्या ओसाड जमिनीवर वृक्षलागवड करुन त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी दोन निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून त्यामध्ये जमा होणाऱ्या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात खतनिर्मिती केली जात आहे. तसेच या ठिकाणी बायोवेस्ट कंपोस्टिंग मशीन, काडीकचरा इंधननिर्मिती यंत्रही येथे ठेवण्यात आले आहे. यातून निर्माण झालेले खत नागरिकांना मोफत दिले जाणार असून प्रत्येकाला घरी झाडे लावण्याचे आवाहनही केले जात आहे.
शालेय अभ्यासक्रमातील विज्ञान विषयात असलेल्या कंपोस्ट खत कसे तयार करतात, इंधननिर्मिती कशी केली जाते याबाबतही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहण्याची संधी दिली जाणार असल्याचे निसर्गप्रेमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील नाईक यांनी सांगितले.
उपक्रमांतर्गत सानपाड्यातील सर्वच सोसायट्यांमधील कचरा, निर्माल्याच्या माध्यमातून खतनिर्मिती तसेच इंधन निर्मितीचा प्रकल्प राबविला जात आहे. नाला, तलाव, समुद्रकिनारी निर्माल्य टाकल्याने शहराचे विद्रूपीकरण तर होतेच त्याबरोबर या नैसर्गिक घटकांचेही प्रदूषण होत असल्याने हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याची माहिती या संघटनेने दिली.
शहरातील इतरही विभागांमध्ये अशाप्रकारचा उपक्रम राबवायचा असेल तर या निसर्गप्रेमी फाऊंडेशच्या सदस्यांच्या मदतीने नागरिकांना परिसरातही हा उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि साहित्य पुरविण्याचे आवाहन या निसर्गप्रेमींनी केले आहे. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे, स्थानिक नगरसेविका रुचा पाटील, उपआयुक्त बाबासाहेब राजाळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. एस.व्ही. पत्तीवार आदी उपस्थित होते.

Web Title: Fuel Production Project from the Trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.