पालिका शाळांमध्ये ग्रंथदालन

By Admin | Published: August 14, 2015 11:50 PM2015-08-14T23:50:20+5:302015-08-14T23:50:20+5:30

स्वच्छतेत अव्वल ठरलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने आता शैक्षणिक दर्जा नव्या उंचीवर नेण्यासाठी पाउले उचलली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग

Fundraising in municipal schools | पालिका शाळांमध्ये ग्रंथदालन

पालिका शाळांमध्ये ग्रंथदालन

googlenewsNext

नवी मुंबई : स्वच्छतेत अव्वल ठरलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने आता शैक्षणिक दर्जा नव्या उंचीवर नेण्यासाठी पाउले उचलली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि ‘रूम टू रीड इंडिया’ या संस्थेच्या वतीने महानगरपालिका शाळांमध्ये ग्रंथालय सुविधेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या उपक्रमातंर्गत ४० शाळांमध्ये ग्रंथ दालनाची निर्मिती करण्यात आली आहे. शुक्रवारी वाशीतील शाळा क्र. २८, सेक्टर १५ येथे ग्रंथ दालन सुरू करण्यात आले.
एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात वाढणाऱ्या या विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी या हेतूने हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. ग्रंथालय दालन असलेल्या शाळेतील ग्रंथालय खोलीही विद्यार्थ्यांना आकर्षित करेल तसेच त्यांचा उत्साह वाढवेल अशा प्रकारे चित्रांनी सजविण्यात आली आहे. त्यामुळे आपोआपच विद्यार्थ्यांचे पाय या खोलीकडे वळतील आणि हळूहळू त्यांना वाचनाची सवय लागेल. या सर्वच खोल्यांमध्ये तीन कपाटे, चार टेबल, १००० पुस्तके, चार पुस्तक प्रदर्शन बॅग, दोन कार्पेट अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. ‘रूम टू रीड इंडिया’ या संस्थेचे संस्थापक सौरभ बॅनर्जी हे आहेत. ते दहा देशांमध्ये व भारतात महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. लहान वयातच मुलांची पायाभूत कौशल्ये व क्षमतांचा विकास करण्याचे उपक्रम या संस्थेमार्फत राबविले जातात. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ४० शाळांमध्ये ग्रंथालय सुविधेचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. ग्रंथ दालनाच्या शुभारंभ प्रसंगी शिक्षण अधिकारी दत्तात्रेय नागरे, रूम टू रीड इंडियाचे राष्ट्रीय संचालक सौरभ बॅनर्जी, राज्य व्यवस्थापक राज शेखर, विजय वाळुंज, अजय वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.

वाचनाची सवय लागली की विद्यार्थ्यांचा विकास नक्कीच होतो. त्यामुळे जीवनात वाचनाचा छंद असलाच पाहिजे. नवी मुंबई महानगरपालिका तसेच रूम टू रीडच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. सर्वच शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
- सुधाकर सोनवणे, महापौर,
नवी मुंबई महानगरपालिका

Web Title: Fundraising in municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.