नैना प्रकल्पाचे भवितव्य अंधारात

By admin | Published: March 21, 2016 01:42 AM2016-03-21T01:42:38+5:302016-03-21T01:42:38+5:30

सिडकोच्या नैना क्षेत्रातील ८४ गावांचे २00 चौरस किलोमीटरचे क्षेत्र नियोजनासाठी एमएसआरडीसीकडे वर्ग केले आहे. त्यापाठोपाठ ७0 गावे प्रस्तावित पनवेल

The future of the Naina project is in the dark | नैना प्रकल्पाचे भवितव्य अंधारात

नैना प्रकल्पाचे भवितव्य अंधारात

Next

कमलाकर कांबळे, नवी मुंबई
सिडकोच्या नैना क्षेत्रातील ८४ गावांचे २00 चौरस किलोमीटरचे क्षेत्र नियोजनासाठी एमएसआरडीसीकडे वर्ग केले आहे. त्यापाठोपाठ ७0 गावे प्रस्तावित पनवेल महानगपालिकेत समाविष्ट होणार असल्याने नैना प्रकल्पाच्या भवितव्यासमोर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील २७० गावांतील सुमारे ६०० चौरस किलोमीटर क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोवर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार सिडकोने नैना प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून नैना प्रकल्पाचा विकासाची योजना सिडकोने आखली आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश आहे. त्याचा विकास आराखडा तयार करून सूचना व हरकतीवरील सुनावणीसह सिडकोने तो अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. चार महिन्यांपासून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून आहे. या आराखड्याला मंजुरी मिळण्याअगोदरच राज्य सरकारने नैना क्षेत्रातील ८४ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळाची नेमणूक केली आहे. यात खालापूरातील ६७, पनवेलमधील १७ गावांचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिकेत ७0 गावांचा समावेश केला जाणार आहे. पनवेलमधील १११ गावांचा नैना क्षेत्रात समावेश आहे. यापैकी १७ गावे एमएसआरडीसीकडे वर्ग के ली आहेत. आणखी ७0 गावांचा पनवेल महानगरपालिकेत समावेश केला जाणार आहे.

Web Title: The future of the Naina project is in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.