शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

गावठाणांचा सर्व्हे होणार, सिडकोवर जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 12:55 AM

गावठाणांचा विकास सिडकोमार्फत होणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईकरांमध्ये असलेला संभ्रम दूर केला आहे.

नवी मुंबई : गावठाणांचा विकास सिडकोमार्फत होणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईकरांमध्ये असलेला संभ्रम दूर केला आहे. गावठाणांच्या विकासावर निर्णय झाल्यानंतरही तो कोणामार्फत होणार याचे चित्र स्पष्ट झालेले नव्हते. अखेर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबाबत घणसोलीत आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यास ते उपस्थित होते.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करून महामंडळासाठी विविध योजना जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्टÑ राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन व प्राण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी आरक्षणाचा निर्णय हीच अण्णासाहेब पाटील यांना खरी श्रद्धांजली अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच हे सरकार माथाडींना उद्ध्वस्त करेल, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, माथाडी चळवळीला सरकार धक्का लागू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर गावठाणांच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेला सर्व्हे सिडकोमार्फत करण्याचाही निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात चर्चा झाली असून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना तसे निर्देश देण्यात आल्याचेही ते म्हणाले. नॅशनल मार्केटच्या निर्णयात माथाडींना समाविष्ट केले नसल्याचे निदर्शनास येताच, सरकारने झालेला निर्णय पत्राद्वारे वरच्या सभागृहातून परत घेतल्याचा ऐतिहासिक निर्णय ठरल्याचेही ते म्हणाले. घणसोली परिसरात माथाडी कामगारांची सिम्पलेक्स वसाहत उभारली आहे. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या १५ वर्षांत त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे या वसाहतींचा क्लष्टर डेव्हलपमेंट अंतर्गत विकास व्हावा, अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे. यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून महामंडळाला योग्य अध्यक्ष मिळाल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनाही भाजपात प्रवेशाचे निमंत्रण देत साताऱ्यात एकही आमदार शिल्लक सोडणार नसल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, मंदा म्हात्रे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, बाळासाहेब पाटील, विजय चौगुले आदी उपस्थित होते.>ऐरोली मतदार संघासाठी चाचपणीमाथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्याकडून ऐरोली मतदार संघातून विधानसभा लढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच उद्देशाने चाचपणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम माथाडी वसाहत असलेल्या घणसोलीत घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत, याकरिता शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांची मदत मिळणार असल्याच्याही चर्चा आहेत. नरेंद्र पाटील यांच्या पाठोपाठ चौगुलेही भाजपाच्या वाटेवर असल्याची दाट शक्यता आहे. गतमहिन्यातच वडार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी चौगुलेंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावरून नवी मुंबईत सत्ताधारी नाईक कुटुंबाला चितपट करण्याच्या खेळी भाजपाकडून खेळल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस