गायीला जीवदान
By admin | Published: April 25, 2017 01:20 AM2017-04-25T01:20:00+5:302017-04-25T01:20:00+5:30
: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या धडकेने जखमी होणाऱ्या मुक्या प्राण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ आहे.
अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या धडकेने जखमी होणाऱ्या मुक्या प्राण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ आहे. अशातच शुक्रवारी महाड व पोलादपूर येथे वाहनांच्या धडकेने गंभीररीत्या जखमी झालेल्या एका गाईला नागरिकांची सतर्कता आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांची समयसूचकता यामुळे जीवदान मिळाले. या गंभीर जखमी गाईवर आसनपोई येथील सफर प्राणी-पक्षी सुश्रूषा केंद्रात उपचार करण्यात येत असल्याची माहिती सफर प्राणी-पक्षी सुश्रूषा केंद्राचे संचालक गणराज जैन यांनी दिली आहे.
एका पिकअप जीपचालकाने वाहन थांबवल्यानंतर आमदार गोगावले यांंनी त्याला गाडीभाडे देवून जखमी गायीला सफर केंद्रापर्यंत नेण्याची विनंती केली. सफर केंद्रात जखमी गाय पोहोचताच गणराज जैन व त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना जैन यांनी उपचार सुरू केले. (विशेष प्रतिनिधी)