शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी होतोय खेळ; २१६ हॉस्पिटल असूनही उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 11:54 PM

कारवाईस मनपाची दिरंगाई

- नामदेव मोरे नवी मुंबई : २१६ हॉस्पिटल, ८१ नर्सिंग होम व तब्बल १,४६१ क्लिनिक असलेल्या नवी मुंबईमध्ये समन्वयाअभावी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. कोरोनाव्यतिरिक्त आजार झाल्यास कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यायचे, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. सुरू असलेल्या रुग्णालयांची व तेथील उपलब्ध बेडची माहितीच उपलब्ध नाही. यामुळे रुग्णांना शहरभर फिरावे लागत असून, वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबईमधील रुग्णालयांकडून सुरू असलेल्या लुबाडणुकीविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर आरोग्य यंत्रणेमधील सावळागोंधळ समोर येऊ लागला आहे. मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, पालिकेने कोरोना नियंत्रणासाठी रुग्णालयांची व बेडची संख्या वाढविली, परंतु कोरोनाव्यतिरिक्त आजारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

नवी मुुंबई सुनियोजित शहर असल्यामुळे सिडकोने प्रत्यक नोडमध्ये रुग्णालयांसाठी भूखंड राखीव ठेवले आहेत. शहरात दौन वैद्यकीय महाविद्यालये, दंतवैद्यकीय महाविद्यालय व इतर अनेक मोठी रुग्णालये आहेत. १० बेडपासून १,१०० बेडची क्षमता असलेली रुग्णालये आहेत. महानगरपालिकेकडील आकडेवारीप्रमाणे तब्बल २१६ हॉस्पिटलची नोंदणी करण्यात आली आहे. ४०५ आयुर्वेदिक, २७२ होमिओपॅथी व तब्बल १,४६१ क्लिनिक शहरात आहेत. तब्बल ८१ नर्सिंग होमची नोंदणी झालेली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात बेडची सर्वाधिक उपलब्धता नवी मुंबईमध्ये असल्याचा दावा यापूर्वी महानगरपालिकेने पर्यावरणविषयक अहवालामध्ये केला होता.

नवी मुंबईमध्ये रुग्णालयांची संख्या पुरेशी आहे, परंतु कोणत्या रुग्णालयात किती बेडची क्षमता आहे, कोणत्या आजारांवर कोणत्या रुग्णालयात विशेष उपचार केले जातात, आयसीयू, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर्सची संख्या कुठे उपलब्ध आहे, याविषयी कोणतीही माहिती महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही. मनपाने कोविड रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध करून दिली आहे, परंतु कोरोनाव्यतिरिक्त आजारांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील बेडची माहिती अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही दोन वर्षांपासून माहितीमध्ये बदल केलेला नाही. संकटकाळात रुग्णालय बंद ठेवणाऱ्यांवर कारवाईची गरज असून, मनपाने अद्याप एकाही रुग्णालयावर कारवाई केलेली नाही.

रुग्णांची फरफट सुरूच

सानपाडामधील ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती शुक्रवारी बिघडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये जागा उपलब्ध होत नव्हती. काही सामाजिक व राजकीय पदाधिकाºयांनी सानपाडा, नेरुळ व इतर ठिकाणच्या रुग्णालयांत संपर्क साधला, परंतु रात्री उशिरापर्यंत बेड उपलब्ध झाला नाही. अखेर सकाळी बेलापूरमधील एक रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई