नवी मुंबई : श्रावणामध्ये महागाईमुळे त्रस्त झालेल्या मुंबई, नवी मुंबईकरांना गणेशोत्सवामध्ये दिलासा मिळाला आहे. मागणी कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही ते प्रतिकिलो शंभरीच्या आतमध्ये आले असून कोथिंबिरीचे दरही निम्म्यावर आले आहेत. मुंबईसह नवी मुंबईमध्ये श्रावणामध्ये सर्वच भाज्यांचे दर प्रतिकिलो शंभरीच्या पुढे गेले होते. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. भाजीपाल्याऐवजी डाळी, कडधान्याला ग्राहकांनी पसंती दिली होती. एक महिना बाजारभाव तेजीत होत. मात्र, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मागणी घटल्याने दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. श्रावणात किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १८० रुपयांवर गेले होते.
आता ते ४० ते ८० रुपयांवर आले आहेत. कोथिंबिरीचे दर २० ते ५० रुपयांवरून १० ते २५ रुपयांवर आले आहेत. इतर भाज्यांचे दरही कमी झाले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये गुरुवारी ५७८ वाहनांमधून २६७७ टन भाजीपाला विक्रीसाठी आला असून त्यामध्ये ५ लाख ७८ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. गणेशोत्सवामुळे मागणी कमी झाली असल्यामुळे दर कमी झाल्याची माहिती बाजार समिती संचालक शंकर पिंगळे यांनी दिली.
होलसेल व किरकोळ मार्केटमधील दरप्रकार २२ ऑगस्ट १ स्प्टेंबर १ सप्टेंंबर (एपीएमसी) (किरकोळ)भेंडी ३० ते ५० २० ते ३४ ४० ते ६०दुधी भोपळा २८ ते ४० १६ ते २८ ५० ते ६०गवार ४५ ते ६५ ४० ते ५० ६० ते ८०ढोबळी मिरची ३० ते ४० २६ ते ३२ ६० दोडका ४० ते ५२ ३२ ते ४४ ६० ते ८०तोंडली ६० ते ८० ४० ते ५० ६०वाटाणा ७० ते १०० ६० ते ७० ८० ते १००