नवी मुंबई, पनवेल : नवी मुंबईसह पनवेलमध्ये गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. पहाटे सहापर्यंत विसर्जन सुरू होते. महापालिकेने ६६ टन निर्माल्य संकलित केले असून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीही केली.नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये दुपारनंतर ढोल-ताशांच्या गजरामध्ये गणेशमूर्तींची मिरवणूक काढण्यास सुरवात झाली. डीजेला बंदी असल्यामुळे गणेश मंडळांनी सातारा,पुणे व इतर ठिकाणावरून ढोल व बेंजो पथकांना आमंत्रित केले होते. ढोल- ताशांच्या गजरामध्ये शिस्तबद्धपणे मिरवणुका काढण्यात आल्या. तीनही ठिकाणी तब्बल ६१ तलावांमध्ये गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती. प्रत्येक तलावावर पट्टीचे पोहणारे व अग्निशमन जवान तैनात केले होते. वाशीमध्ये हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. शिवाजी चौक ते विसर्जन तलावापर्यंत दोन्ही बाजूंना मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक उभे होते. वाशी शिवाजी चौकामध्ये गणेश मूर्तींवर महापालिकेच्यावतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. गणेश मंडळांचे स्वागतही करण्यात येत होते. विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व तलाव व विसर्जन मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. पोलिसांनी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीपासून मंडळांशी योग्य संवाद ठेवला होता. यामुळे संपूर्ण उत्सव शांततेमध्ये पार पाडण्यात यश आले.पनवेल परिसरामध्येही शांततेमध्ये उत्सव पार पडला. १२ हजारपेक्षा जास्त गणरायांना शेवटच्या दिवशी निरोप देण्यात आला. महापालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन तलावावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी टाळ, मृदुंगाच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. भजनाचे सूरही अनेक मिरवणुकांमधून ऐकायला मिळत होते. महापालिकेने पर्यावरणपूरक गणेश मंडळांना प्रमाणपत्र देण्यात आले. पनवेलमध्येही स्वयंसेवकांनी गणेश भक्तांसाठी पाणी व अल्पोपहाराचीही सोय केली होती. पनवेलमध्ये आयुक्त गणेश देशमुख, परिमंडळ दोनचे उपआयुक्त अशोक दुधे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.गणेशभक्तांना पाणीवाटपएनबीएचएस संजीवन फाउंडेशन आणि फ्युचर फर्स्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशभक्तांना पाणीवाटप करण्यात आले. गणेश विसर्जनादरम्यान गणेशभक्तांची सोय व्हावी, या उद्देशाने या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून वाशी येथे विसर्जन मार्गावर स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी गणेशभक्तांना बिस्लरी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. संजीवन फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता मोरे, सेक्रेटरी सुशांत पटनाईक, खजिनदार महादेव डुंबरे, गुलाम पटेल, विवेक तांबे, बलभीम गंगणे, सुभाष जठार, दुर्गाप्रसाद देवकर,नितीन सोनवणे, अर्जुन पाटील, विनोद जाधव, सुरेश ननावरे, अनिल जाधव तसेच फ्युचर फर्स्ट फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा निर्मला धोंडीराम वाघमारे, सेक्रेटरी अभय धोंडीराम वाघमारे, खजिनदार वैभव कदम, अॅड. नीलेश भोजने, अॅड. स्वप्ना भोजने आदींसह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलिसांचे मानले आभारनवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. गणेशोत्सव मंडळाच्या विभाग स्तरावर तब्बल ७२ बैठका घेण्यात आल्या होत्या. सुरक्षेसाठी सर्वांना विश्वासात घेवून अॅक्शन प्लॅन तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली. यामुळे उत्सव मंडळ, लोकप्रतिनिधी व नागरिकांनीही पोलिसांचे आभार मानले आहेत.ेउरणमध्ये विसर्जनासाठी पीरवाडी, माणकेश्वर किनाºयावर गणेशभक्तांची गर्दीउरण : उरण परिसरात पीरवाडी, माणकेश्वर, मोरा, करंजा, घारापुरी सागरी किनारी आणि विविध खाड्यांमध्ये, तलावांमध्ये अनंत चतुर्दशीच्या गणपतींचे रविवारी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात विसर्जन करण्यात आले. गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आणि विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी पीरवाडी, माणकेश्वर समुद्रकिनारी आणि उनपच्या विमला तलाव परिसरात गणेश भक्तांनी गर्दी केली होती. मध्यरात्रीपर्यंत चाललेला विसर्जन पाहण्यासाठी पिरवाडी, माणकेश्वर समुद्रकिनारी आणि उनपच्या विमला तलाव परिसरात गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती.६६ टन निर्माल्य जमाविसर्जन स्थळावर येणाºया पुष्पमाळा, फुले, दूर्वा, तुळस, फळांच्या साली, तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोग्य ओले निर्माल्य, मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान, प्लॅस्टिक, थर्माकोल, असे सुके निर्माल्य ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कलशांची व्यवस्था केली होती. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार या संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. गणेशोत्सव काळामध्ये तब्बल ६६.५० टन निर्माल्य संकलित केले असून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
गणपती गेले गावाला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 3:46 AM