पनवेल - पनवेल महानगर पालिकेचे नननिर्वाचित आयुक्त गणेश देशमुख यांनी दि.१८ रोजी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.मात्र मावळते आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे मात्र यावेली अनुपस्थित होते. गणेश देशमुख हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त झालेले अ श्रेणीचे नगरविकास विभागाचे अधिकारी आहेत . नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या आयुक्तपदावरून बदली होवून त्यांना पनवेल महानगर पालिकेचे आयुक्तपद देण्यात आले आहे. त्यांनी यापूर्वी कल्याण डोंबिवली , व कोल्हापूरच्या, मिरा भाईदर उपायुक्तपदी काम केले आहे . कोल्हापूर महानगर पालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाची जबाबदारी हि त्यांनी चोखपणे पार पाडली आहे .नांदेड शहराचा घनकचरा व्यवस्थापन , व स्वच्छतेच्या बाबतीत महत्वाचे काम केले आहे . त्यांच्या या कामाबाबत राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विशेष सत्कार केले आहे .
गणेश देशमुख यांनी स्वीकारला पनवेलच्या आयुक्तपदाचा पदभार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 4:13 PM