प्राची सोनवणे नवी मुंबई : मराठमोळ््या परंपरेनुसार सण-उत्सव साजरा करण्यासाठी ढोल-ताशा पथकांची साद आवश्यक आहे. पाश्चिमात्य डीजे संस्कृतीला मागे टाकत राज्यातील ढोल-ताशा पथकांनी मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला आहे. बाप्पाच्या आगमनाकरिता ढोल-ताशा पथकांची जोरदार तयारी सुरू असून यंदा नवे ताल ऐकता येणार आहे.वाद्य पूजनाने पथकाने जोरदार तयारीला सुरुवात केली असून नवी मुंबईतील ढोल-ताशा पथकाच्या वतीने यंदा २८ ताल सादर करणार असल्याची माहिती पथक प्रमुखांनी सांगितली. पथकांमध्ये महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महिला सुरक्षेचीही तितकीच दखल घेतली जात असल्याची माहिती ढोल- ताशा पथकांनी दिली आहे. मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया, जय भवानी जय शिवाजीचा नारा नवनव्या तालांचा थरार याही वर्षी ऐकायला मिळणार असून, हलगी, संबळ, पखवाज या पारंपरिक वाद्यांतून निघाणाºया ध्वनिलहरी आणि ढोल-ताशातून निघणाºया ध्वनिलहरींचा संयोग साधत बसविलेले नवे ताल यंदाच्या वादनातील वेगळे वैशिष्ट्य ठरणार आहे. बाप्पाचे स्वागत जल्लोषात करायचे म्हणून मागील दोन महिन्यांपासून केलेला तालाचा सराव सुरु असून पारंपरिकतेला नावीन्याची जोड दिली आहे. काही पथकांनी लावणी, भांगडा, दांडिया, गरबा आणि जोगवा यासह हिंदी-मराठी चित्रपटांतील काही गाण्यांवर ताल बसविले. पाश्चात्य संगीतावर आणि टाळ्यांच्या गजरात बसविलेला ताल असे विविध प्रकारचे ताल ढोल-ताशा पथकांनी बसविले आहेत. ऐरोलीतील नादगर्जा,वाशीतील शिव-स्वराज्य ढोल-ताशा पथकाचाही जोरदार सराव सुरु असून बाप्पाच्या आगमन सोहळ््याकरिता ध्वज पथकाचाही समावेश करण्यात आला आहे.गणेशोत्सवासाठी ढोल-ताशा पथकांनी नवनवे ताल तयार केले आहेत. सरावादरम्यान नागरिकांना कसलाही त्रास होता कामा नये याची पुरेपूर दखल घेतली जाते. रहिवासी संकुलापासून दूरच्या अंतरावर सराव केला जात आहे. ढोल-ताशा पथकामध्ये चिमुरड्यापासून ते वयोवृध्दाचा समावेश असून प्रत्येकाला प्रशिक्षण दिले जाते. ढोल- ताशाबरोबरच इतर पारंपरिक वाद्याचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.मराठी अस्मिता जपणारडीजे संस्कृतीपेक्षा मराठी ढोल-ताशांमध्ये असलेले वेगवेगळे ताल त्याला पारंपरिक वाद्यांनी दिलेली साद याचे प्रात्यक्षिक नवी मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे.आगमन सोहळ््यात मराठी अस्मितेचा झेंडा फडकविणार असून मराठी संस्कृती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असल्याची माहिती पथकांच्या सदस्यांनी दिली.नोकरी करून पथकाचे नेतृत्वखारघरमधील उत्सव ढोल-ताशा पथकाचा प्रमुख आशिष बाबर याने दिलेल्या माहितीनुसार पथकातील सदस्य नोकरी करून ढोल-ताशा वाजविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. वेळात वेळ काढून न चुकता सराव केला जात आहे. या पथकात ६०हून अधिक महिलावर्गाचा समावेश असून गेल्या वर्षीच्या तुलनेत पथकातील मुलींची संख्या दुपटीने वाढल्याचे आशिषने सांगितले. यंदाचा रंगारी बदक चाळ आगमन सोहळ््याचा मान या पथकाला मिळाला आहे.
यंदा गणेशोत्सवात वाजणार नवनवीन ताल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 6:53 AM