शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

गणपती बाप्पा पावला! ३५० टन नारळाची आवक; १,८६४ टन फळांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 5:52 AM

माघी गणेशोत्सवामुळे फळांसह नारळ, गूळ, साखरेलाही मागणी वाढली आहे.

नवी मुंबई :

माघी गणेशोत्सवामुळे फळांसह नारळ, गूळ, साखरेलाही मागणी वाढली आहे. मंगळवारी फळ मार्केटमध्ये तब्बल १ हजार ८६४ टन फळांची विक्री झाली आहे. ३५० टन नारळ, ३७४ टन साखरेसह गुळालाही मागणी वाढली आहे. उत्सवामुळे केळी, संत्री, मोसंबी, सफरचंदला ग्राहकांनी पसंती दिली आहे. 

बाजार समितीमधील मसाला मार्केटमध्ये तीन दिवसांमध्ये जवळपास १ हजार टन नारळाची विक्री झाली. मंगळवारी ३५० टन नारळाची आवक झाली आहे. गणेशोत्सवाबरोबर घरगुती वापरासाठीही नारळाला मोठी मागणी असते. दक्षिणेतील राज्यांतून नारळाची आवक होत आहे. बाजार समितीमध्ये दिवसभरात ३७४ टन साखर, ३३ टन गूळ, ३ टन तुपाची आवक झाली आहे. सुक्यामेव्यालाही समाधानकारक मागणी होती.

गणेशोत्सवामुळे फळांना मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी १२०० ते १५०० टन फळांची आवक होत आहे. गणेशोत्सवामुळे १८०० टन फळांची आवक झाली आहे. सफरचंद, संत्री, मोसंबी यांना गणेशभक्तांकडून मोठी मागणी आहे. उत्सवामुळे केळीचाही खप वाढला आहे. बाजार समितीच्या बाहेरील पूजा साहित्य व इतर वस्तू  खरेदीच्या मार्केटमध्येही ग्राहकांनी गर्दी केली होती. 

    वस्तू    बाजारभाव    आवक (टन)     कलिंगड    ६ ते १० किलो     ४२३    साखर    ३३ ते ३६ किलो     ३७४    नारळ    १२ ते २० नग     ३५०    संत्री    ६० ते ९० किलो     २६४    पपई    १० ते २६ किलो     २२५    मोसंबी    ४० ते ८० किलो     १८८    अननस    २० ते ४० किलो     १२९    सफरचंद    ७० ते १०० किलो     ११५    डाळींब    ८० ते १५० किलो     ७५    चिक्कू    ३० ते ४० किलो     ४३    गूळ    ४६ ते ५१ किलो     ३३सण, उत्सव काळात फळांनाही मागणी वाढते. माघी गणेशोत्सवात देवापुढे प्रसाद ठेवण्यासाठी व पूजेसाठी फळांची आवश्यकता असते. सध्या बाजार समितीमध्ये संत्री, मोसंबी, सफरचंद, कलिंगड, अननस व इतर फळांची चांगली आवक होत आहे.     - संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट