रुग्णांना आनंद देणारा गणेशोत्सव, रायगड जिल्हा रु ग्णालयाचे ५९वे वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:26 AM2017-08-28T04:26:29+5:302017-08-28T05:13:46+5:30
ऐन सणाच्या काळात आणि त्यातही गणेशोत्सवात आजारी पडून रुग्णालयात दाखल होणे कुणालाही आवडणार नाही; परंतु प्रकृतीचा काही नेम नसतो. अशा वेळी रु ग्णालयात दाखल झालेल्या रु ग्णांना आपल्या घरच्या गणेशोत्सवात सहभागी होता येत नाहीÞ. त्याचे शल्य त्यांना सारखे जाणवत राहते.
विशेष प्रतिनिधी
अलिबाग : ऐन सणाच्या काळात आणि त्यातही गणेशोत्सवात आजारी पडून रुग्णालयात दाखल होणे कुणालाही आवडणार नाही; परंतु प्रकृतीचा काही नेम नसतो. अशा वेळी रु ग्णालयात दाखल झालेल्या रु ग्णांना आपल्या घरच्या गणेशोत्सवात सहभागी होता येत नाहीÞ. त्याचे शल्य त्यांना सारखे जाणवत राहते.
रु ग्णाला खरच पटकन बरे व्हायचे असेल, तर तो प्रथम मानसिकदृष्ट्या बरा होणे गरजेचे असते, त्यासाठी तसे वातावरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे, या अत्यंत आरोग्यदायी भावनिक तथा श्रद्धेय मुद्द्याचा जाणीवपूर्वक विचार करून येथील रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयात सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा ५८ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. यंदा ५९वा सार्वजनिक गणेशोत्सव जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या या गणेशोत्सवात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कार्यालयीन कर्मचारी वर्ग असे सर्वच जण सक्रियतेने सहभागी होतात. गणेशोत्सवात आरोग्य विषयक जनजागृती हा हेतू या गणपतीच्या आरास आणि सजावटीच्या माध्यमातून अनाहूतपणे गेल्या अनेक वर्षांपासून साध्य करण्यात येतो. जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात असलेल्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनींसह परिचारिका रांगोळी, चित्रकला आदी विविध स्पर्धांचे आयोजन येथे करतात.
रुग्णालयात दाखल असणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना जिल्हा रुग्णालयातील हा गणपती बाप्पा आपला वाटतो. गणेशोत्सव काळात रुग्णालयात दाखल असणारे रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यावर पुढच्या वर्षी आवर्जून या गणपतीला नमस्कार करायाला वा प्रसंगी आपला नवस फेडण्याकरितादेखील येत असतात. यंदा रायगड जिल्हा रुग्णालय गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी हे आहेत.