धार्मिक एकोपा जपणारा गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:43 AM2019-09-05T02:43:50+5:302019-09-05T02:44:06+5:30

नवी मुंबई : वाशी सेक्टर १७ येथील सार्वजनिक गणेशोत्स मंडळाने मागील ३४ वर्षात गणेशोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने धार्मिक व ...

Ganeshotsav celebrating religious monologue | धार्मिक एकोपा जपणारा गणेशोत्सव

धार्मिक एकोपा जपणारा गणेशोत्सव

googlenewsNext

नवी मुंबई : वाशी सेक्टर १७ येथील सार्वजनिक गणेशोत्स मंडळाने मागील ३४ वर्षात गणेशोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने धार्मिक व सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न केला आहे. या मंडळाच्या कार्यकारिणीत विविध धर्मिय व प्रांतीय प्रतिनिधींचा सहभाग आहे. मंडळाने साकारलेला देखावा पाहण्यासाठी नवी मुंबईसह मुंबई व ठाणे येथील भाविकांची रिघ लागलेली असते. यावर्षी मंडळाने उत्तराखंडातील शिवमंदिराचा देखणीय देखावा साकारला आहे.

माजी नगरसेवक संपत शेवाळे यांच्या पुढाकारातून १९८५ मध्ये या मंडळाची स्थापणा करण्यात आली. सुरूवातीच्या काळात एक ते पाच रूपयापर्यंतच्या वर्गणीतून उत्सव सुरू करण्यात आला. पुढे मंडळाचे विद्यमान सेक्र ेटरी मदन शितोळे, उपाध्यक्ष दिलीप राऊत, सल्लागार राम विचारे, दिनेश कनाने, गल्पतभाई पटेल आदींच्या सहकार्याने मंडळाच्या उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. आज नवसाला पावणारा वाशीचा महाराजा या नावाने या मंडळाच्या गणेशाची ओळख निर्माण झाली आहे. मंडळाच्या स्थापनेपासून माजी मंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या यांच्या हस्ते गणपतीची स्थापना करण्यात येते. ही परंपरा आजही कायम असल्याचे संपत शेवाळे यांनी सांगितले.
शहरातील हा सर्वात जुना गणेशोत्सव असल्याने त्याबाबत रहिवाशांत कमालीची श्रध्दा आहे. याचा परिणाम म्हणून उत्सावाचे दहा दिवस नवसाला पावणाºया महाराजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रिघ लागते. केवळ गणेशोत्सवापुरतेच सिमित न राहता मंडळाने सामाजिक व धार्मिक एकोपाही जपला आहे.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात
मंडळाच्या माध्यमातून भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त तसेच छावण्यासाठी मदत केली जाते. यावर्षी सांगलीतील पूरग्रस्तांना मंडळातर्फे भरीव मदत करण्यात आली. येथील साप्तेवाडी आणि बाणेवाडी गावातील पाचशे कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे.
 

Web Title: Ganeshotsav celebrating religious monologue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.