- नामदेव मोरे नवी मुुंबई : लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटातच नवीन नोकरी शोधण्याची वेळ अनेकांवर आली असून अशा तरुणांना फसवणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्या आहेत. नोकरी, फ्रँचायजीसह विविध प्रकारची आमिषे दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला जात असून अशा ठकसेनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.ऐरोली सेक्टर ८ मध्ये राहणाºया तरुणीने आॅस्ट्रेलियामधून बायोटेकमध्ये मास्टर्स पदवी मिळविली आहे. फेब्रुवारीमध्ये ती भारतात परत आली असून ‘नोकरी डॉट कॉम’वर नोकरीसाठी अर्ज केला होता. एका विदेशी कंपनीच्या नावाने ठकसेनांनी तिच्याशी संपर्क साधला व विविध कारणांनी तिच्याकडून ५ लाख ७९ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. कोपरखैरणेमधील एका तरुणालाही अशाच प्रकारे युनायटेड किंगडममध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार होऊ लागल्या आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरही ठकसेनांच्या कारवाया सुरूच आहेत. आॅनलाइन व्यवहार करणाºया नागरिकांचीही विविध कारणांनी फसवणूक केली जात आहे. नोकरी शोधणारे, फ्रँचायजी मिळविण्याचा प्रयत्न करणारे तर काही वेळा आॅनलाइन खरेदी करणाऱ्यांना लक्ष्य करून लुटले जात आहे. लॉकडाऊनपासून अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. चार ते पाच महिने घरात बसल्यामुळे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेक जण नवीन नोकरी मिळविण्यासाठी नोकरी डॉट कॉम किंवा इतर संकेतस्थळांवर अर्ज करीत आहेत. काही जण नवीन व्यवसाय सुरू करण्याचाही प्रयत्न करीत असून याचाच गैरफायदा फसवणूक करणारे घेत आहेत. नवी मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी वारंवार जनजागृती केली आहे. नागरिकांनी आॅनलाइन व्यवहार करताना सावधान राहावे, असे आवाहनही केले आहे. आॅनलाइन व्यवहार करताना काय काळजी घ्यावी याविषयी माहितीही वारंवार देण्यात येत आहे. परंतु यानंतरही नागरिक ठकसेनांच्या आमिषाला बळी पडून लाखो रुपयांचे नुकसान करून घेत आहेत.पावणेसहा लाखांची फसवणूकऐरोलीमधील एका युवतीला कॅनडामधील कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखविण्यात आले. ९ मार्चला व्हिजा व वर्कपरमिटसाठी ३५ हजार रुपये बँक खात्यात पाठविण्यास सांगण्यात आले. यानंतर आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध कारणांसाठी एकूण ५ लाख ७९ हजार रुपये उकळले; परंतु प्रत्यक्षात नोकरी दिलीच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या युवतीने रबाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.साडी खरेदी पडली महागातसीवूडमधील एक महिला महावितरणमध्ये नोकरी करीत आहे. १२ जुलैला त्यांनी माय मूड डॉट इन या साईटवर जाऊन ११९८ रुपयांना दोन साड्या खरेदी केल्या होत्या. यानंतर ठकसेनांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून डेबिट कार्डचा नंबर व इतर तपशील मिळविला व त्यांच्या बँक खात्यातून ११ वेळा ९९०९ रुपये असे एकूण १ लाख ९८९९ रुपये काढून त्यांची फसवणूक केली.नवी मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी वारंवार जनजागृती केली आहे.नागरिकांनी आॅनलाइन व्यवहार करताना सावधान राहावे, असे आवाहनही केले आहे.फ्रँचायजीचे आमिषकोपरखैरणेमध्ये राहणाºया ३१ वर्षांच्या तरुणाचा सायबर कॅफे आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने त्याने जिओमार्टची फ्रँचायजी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. २४ जुलैला त्यांना जिओमार्टमधील कर्मचारी बोलत असल्याचे सांगण्यात आले. ५ आॅगस्टपर्यंत विविध कारणांनी १ लाख २४०० रुपये वसूल करून फसवणूक करण्यात आली.यूकेमध्ये नोकरीकोपरखैरणे सेक्टर ९ मधील ३२ वर्षांच्या तरुणाला ४ जुलैला युनायटेड किंगडममध्ये रॉयल फ्री हॉस्पिटलमध्ये नोकरीचे आमिष दाखविण्यात आले. ७ जुलैपासून १७ जुलैपर्यंत वर्कपरमिट व विविध कारणांनी त्याच्याकडून ३ लाख ५ हजार रुपये उकळले व नोकरी न देता फसवणूक केली आहे.सोफा विक्रीचा फटका : सीवूड सेक्टर ५० मधीध ५२ वर्षांचे इंजिनीअर नोएडामध्ये काम करतात. लॉकडाऊनमुळे ते घरातूनच काम करीत आहेत. त्यांनी घरातील जुना सोफा व डायनिंग टेबल विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात केली होती. ठकसेनाने ७ आॅगस्टला त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या खात्यातून १८ वेळा विविध रक्कम टाकून एकूण १ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केली.
कोरोनातही ठकसेनांच्या टोळ्या सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 1:05 AM