घणसोलीत पदपथांवर कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 04:07 AM2018-04-22T04:07:38+5:302018-04-22T04:07:38+5:30

स्वच्छतेचा बोजवारा : नागरी आरोग्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; रस्त्यांवर कचºयाचे ढीग

Garbage on the footpath in Ghansoli | घणसोलीत पदपथांवर कचरा

घणसोलीत पदपथांवर कचरा

Next

नवी मुंबई : सर्वेक्षण संपल्यानंतर शहरातील स्वच्छतेकडे अधिकारी कर्मचारी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग पाहायला मिळत असून, पालिकेनेच छाटलेल्या झाडांच्या फांद्या पदपथांवर पडून आहेत. यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, पदपथांवर पादचाºयांची अडवणूक होत आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत शहर देशात अव्वल ठरावे, यासाठी मागील महिन्यात प्रशासनाकडून अनेक प्रयत्न झाले. मात्र, समितीकडून शहराची पाहणी झाल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून केवळ सर्वेक्षणाला सामोरे जाण्यासाठी पालिकेकडून शहरात स्वच्छतेचा दिखावा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घणसोली नोडमध्ये अनेक दिवसांपासून जागोजागी कचºयाचे ढीग पाहायला मिळत आहेत. काही सोसायटींच्या बाहेरच उघड्यावर कचरा साठवला जात आहे. तर ज्या ठिकाणी घनकचरा वाहतूक करणारे वाहन थांबवले जाते, त्या ठिकाणी वाहनातून सांडणारे घाण पाणी साचत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. अशाच प्रकारे ए.एस.पी. शाळेसमोर घरोंदा वसाहतीमध्ये पालिकेनेच पदपथ अडवून ठेवले आहेत. परिसरातील वृक्षांच्या छाटलेल्या फांद्या पदपथावर साठवल्या आहेत. मागील कित्येक दिवसांपासून हा कचरा ठिकठिकाणी साचलेला आहे; परंतु रस्ते सफाई करताना सफाई कामगारांकडून तो उचलला जात नाही. यामुळे नागरिकांना पदपथावरून चालता येत नसल्याने गैरसोय होत आहे. कचरा कुजत चालल्याने दुर्गंधी पसरत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा संताप सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. स्वप्निल जगताप यांनी व्यक्त केला.

तक्रारींची दखल नाही
पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी येणाºया पालकांनाही याचा त्रास होत आहे. यासंदर्भात त्यांनी पालिकेच्या अधिकाºयांकडे अनेकदा तक्रार केली; परंतु केवळ ठरावीकच बाबींना प्राधान्य देणारे प्रशासन घणसोलीत नागरी समस्या सोडवण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याचीही खंत सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. स्वप्निल जगताप यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Garbage on the footpath in Ghansoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.