कळंबोलीत खड्ड्याना घातले हार; शेकापचे अनोखे आंदोलन
By वैभव गायकर | Published: October 10, 2023 04:15 PM2023-10-10T16:15:04+5:302023-10-10T16:15:21+5:30
माजी नगरसेवक रवींद्र भगतमाजी नगरसेवक गोपाळ भगत यांनी हे आंदोलन छेडले.
पनवेल:कळंबोली शहरात होणाऱ्या विकासकामावरून भाजपने श्रेयवादाला सुरुवात झाल्यानंतर शेकापने शहरात पडलेल्या खड्ड्यात हार घालून अनोखे आंदोलन छेडले.खारघर शहरात खड्डे बुजण्यास सुरुवात होत असताना कळंबोलीतील खड्डे कधी दुरुस्त करणार असा सवाल शेकापच्या आंदोलकांनी दि.10 रोजी केलेल्या आंदोलनात उपस्थित केला.
माजी नगरसेवक रवींद्र भगतमाजी नगरसेवक गोपाळ भगत यांनी हे आंदोलन छेडले. कळंबोलीतील शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यात दररोज अपघात होत आहेत.एमजीएम रुग्णालयासमोरील खड्डे हे सर्वाधिक आहेत.प्रशासनाला वेळोवेळी सांगुन देखील प्रशासन याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रवींद्र भगत यांनी केला.कळंबोली शहरात जवळपास 300 कोटींच्या कामांना पालिकेने मंजुरी दिली आहे.या कामांचे श्रेय भाजप घेत आहे.मग नागरिकांना खड्ड्यातून जावे लागते त्याचे श्रेय देखील भाजपनेच घ्यावे अशी मिश्किल टीका भगत यांनी केली.