नवी मुंबई : राज्यातील सर्वच शहरांमध्ये लसणाच्या दरामध्ये प्रचंड वाढ होत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये १२० ते २३० रुपये दराने लसणाची विक्री होत आहे. पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी सर्वाधीक १०० ते २७० रुपये किलो भाव मिळाला. मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये ३०० ते ३८० रुपये दराने विक्री होत आहे. अफगाणीस्तानच्या लसूणची आवकही होऊ लागली असून त्याचे दरही देशी लसूणपेक्षा जास्त आहेत.
देशामध्ये लसणाची आतापर्यंतची सर्वात मोठी टंचाई निर्माण झाली आहे. चालू हंगामामधील साठा संपत चालला असून बाजारभावाचा विक्रम झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी २२६ टन लसणाची आवक झाली आहे. मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. देशी लसूणचे दर १२० ते १८० रुपये किलोवर पोहचले आहेत. अफगाणीस्तानमधूनही काही प्रमाणात आवक होत आहे. आयात झालेल्या लसूणचे दर २०० ते २३० रुपये आहेत. भाव कमी करण्यासाठी आयात लसूणचा काहीही उपयोग होत नाही. नवी मुंबई मधील किरकोळ मार्केटमध्ये लसूण सरासरी ३०० ते ३८० रुपये किलो दराने विकला जात आहे. काही ठिकाणी चांगल्या दर्जाच्या लसूणची किम्मत यापेक्षाही जास्त आहे.
राज्यातील बहुतांश सर्वच बाजार समित्यांमध्ये लसणाने २०० चा टप्पा ओलांडला आहे. पुणेमध्ये १०० ते २७०, नागपूरमध्ये १६० ते २४० रुपये दराने लसूण विकला जात आहे. नवीन लसूण मार्केटमध्ये येईपर्यंत अशीच स्थिती राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील लसणाचे प्रतीकिलो बाजारभावबाजार समिती - बाजारभावमुंबई - १२० ते २३०पुणे - १०० ते २७०सोलापूर ११५ ते २२०अकलूज १५० ते २००हिंगणा २२० ते २५०नाशिक ७५ ते २०१सांगली १२५ ते २२६नागपूर १६० ते २४०
कांद्याची घसरण सुरूचशासनाच्या निर्यातीबंदीच्या निर्णयामुळे कांद्याची घसरण सुरू झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये गत आठवड्यात कांदा २५ ते ४५ रुपये किलो दराने विकला जात होता. सोमवारी १२०० टन आवक झाली असून कांद्याचे दर १३ ते २९ रुपये एवढे कमी झाले आहेत. बाजार समिती संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले की निर्यातबंदीमुळे दर कमी झाले असून नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यामुळेही दरात घसरण झाली आहे.