तळोजा एमआयडीसीमध्ये वायुगळती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 09:29 PM2019-08-05T21:29:42+5:302019-08-05T21:31:18+5:30
भंगारामध्ये आलेला हा सिलिंडर अतिशय जुना असून तोडण्याचा प्रयत्न करतेवेळी त्यामधून विषारी वायूची गळती झाली.
पनवेल :तळोजा एमआयडीसीतील एका प्रिंटिंग प्रेसच्या बाजूला असणाऱ्या भंगारच्या दुकानात दि .५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास एका सिलिंडरमधून विषारी वायू गळती झाली होती. यामध्ये आजूबाजूला असणाऱ्या चार जणांना या विषारी वायूचा त्रास झाल्यामुळे एमजीएम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.
भंगारामध्ये आलेला हा सिलिंडर अतिशय जुना असून तोडण्याचा प्रयत्न करतेवेळी त्यामधून विषारी वायूची गळती झाली. तळोजा अग्निशमन विभागाला याची माहिती मिळताच ताबडतोब फायर स्टेशन ऑफिसर दिपक दोरागडे हे स्वतः आपल्या अग्निशमन दलाच्या जवानांसोबत आले व त्यांनी तो विषारी वायू असलेला सिलिंडर निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला. वायूची तिव्रता कमी करण्यासाठी बाजूला मोकळ्या जागेत पाणी भरलेल्या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने हा सिलिंडर टाकण्यात आला. तळोजा पोलिसांकडून भंगारवाल्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान संबंधित भंगारवाला हा त्याठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय करत होता .या घटनेमुळे तळोजा एमआयडीसी मध्ये एकच खळबळ उडाली आहे .