तळोजांत प्रकल्पग्रस्त एकत्र

By admin | Published: February 15, 2017 04:59 AM2017-02-15T04:59:19+5:302017-02-15T04:59:19+5:30

सिडको, महापालिका प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अर्धवट ठेवून, अन्यायकारक पावले उचलून गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई

Gather together the Talojant Project | तळोजांत प्रकल्पग्रस्त एकत्र

तळोजांत प्रकल्पग्रस्त एकत्र

Next

पनवेल : सिडको, महापालिका प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अर्धवट ठेवून, अन्यायकारक पावले उचलून गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई सुरू केली आहे. याविरोधात आवाज उठविण्यासाठी अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भारतीय नागरिक मंचमार्फत गावोगावी बैठका घेण्यात येत असून कारवाईविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. रविवारी तळोजा गावात पार पडलेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी संतप्त भावना व्यक्त करीत सिडको, महापालिकेविरोधात लढा देण्याचा निर्धार केला आहे.
पनवेल शहर महानगरपालिकेत समाविष्ट खारघर, कळंबोली, कामोठे, नावडे, तळोजा, पेंधर याठिकाणच्या गावांना भेडसावणाऱ्या समस्या, सिडकोकडून गावात पायाभूत सुविधा मिळण्याबाबत, पालिका हद्दीत समाविष्ट गावात समान घरपट्टी लादावी, वीटभट्टी मालकांना भूखंड उपलब्ध करून द्यावेत, मासळी बाजार, भाजी मार्केट उपलब्ध करून द्यावेत आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Gather together the Talojant Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.