शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप; पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 12:02 AM

नवी मुंबईसह पनवेलमध्ये विसर्जन; पोलिसांची चोख व्यवस्था

नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेल परिसरात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पासह गौरीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गौरी-गणपतीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर पनवेल महापालिका क्षेत्रातील दुपारनंतर गौरी-गणपतीमूर्तींचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

गौरी-गणपती विसर्जनाला दुपारनंतर सुरुवात झाली. रिमझिम कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता वाजतगाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जन सुरू होते. विसर्जनासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांवर जवळपास ७०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील २३ तलावांवर रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. दिवाळे कोळीवाडा, घणसोली, वाशी, कोपरखैरणे आणि दिघा तलावांवर भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. संध्याकाळी ४ वाजल्यानंतर गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. ढोल-ताशाच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करीत उत्साहात; तितक्याच भावपूर्ण वातावरणात गौरी-गणपतीला निरोप देण्यात आला. पोलिसांनी वाहतुकीचे उत्तम नियोजन केले होते. महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांना भेटी देऊन विसर्जन व्यवस्थेच्या कामावर लक्ष ठेवून होते.

उरणमध्ये मोरा सागरी पोलीस, उरण पोलीस आणि न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाणे आदी तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे साडेपाच हजार गौरी-गणपतीमूर्तींच्या विसर्जनासाठी दुपारपासूनच सुरुवात झाली होती. फुले, तोरणांनी सजविण्यात आलेल्या विविध गाड्यातून वाजत-गाजत गौरी-गणपती विसर्जनासाठी निघाले होते. उरण परिसरातील घारापुरी, मोरा, न्हावा, गव्हाण हनुमान कोळीवाडा, करंजा, पीरवाडी, माणकेश्वर आदी समुद्राच्या खाडीत तर परिसरातील विविध गावांतील तलावात गौरी-गणपतीमूर्तींना भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली होती. उरण शहरातील विमला तलावात हजारो गौरी-गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन केले जात होते.

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने उरण परिसरात शांततेत विसर्जन झाल्याची माहिती उरण वपोनि जगदीश कुलकर्णी यांनी दिली. पनवेल शहरासह ग्रामीण भागात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. महापालिकेच्या वतीने विसर्जनस्थळांवर विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

सहा दिवसांच्या गणपतीसह गौरीमूर्तींचेही विसर्जन करण्यात आले. सहा दिवसांच्या गणपतीला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. यात घरगुती गणपती डोक्यावर घेऊन तर कित्येकांनी खासगी गाडीतून जयघोष करीत बाप्पाची मिरवणूक काढली.या मिरवणुकीत लहान मुलांसह, महिला, पुरु ष, प्रौढांनीही सहभाग घेतला होता. संपूर्ण पनवेल परिसरात श्रींच्या मिरवणुका निघाल्या होत्या.

गुलालाची उधळण करत, तालुक्यातील गावांमध्ये गाढी नदीमध्ये गौराई व गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.पालिका हद्दीत ठिकठिकाणच्या तलावात, कोळीवाडा-गाढी नदी, पनवेल बंदर, वडाले तलाव, तक्का, पोदी, आदई तलाव, सुकापूर, खिडूकपाडा स्टील मार्केट, खांदेश्वर शिव मंदिर आदी ठिकाणी विसर्जन करण्यात आले.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019