पनवेल-तळोजा रेल्वेमार्गावर जिलेटीन
By admin | Published: February 10, 2017 05:09 AM2017-02-10T05:09:25+5:302017-02-10T05:09:25+5:30
पनवेल तळोजा मार्गावर आज सकाळी जिलेटीनच्या साडेतीन काड्या ठेवलेल्या आढळल्या. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तळोजा: पनवेल तळोजा मार्गावर आज सकाळी जिलेटीनच्या साडेतीन काड्या ठेवलेल्या आढळल्या. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यातील रेल्वेरूळ परिसरात घडलेली ही सलग तिसरी घटना आहे. त्यामुळे आता रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी स्वत: लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तळोजा रेल्वे स्थानकाकडून पनवेलला जाणाऱ्या मार्गावरील ६२/१० या अंतरावर जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. रेल्वे खलाशाला हे निदर्शनास आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्याने पोलिसांना याबाबत तात्काळ माहिती दिल्यानंतर एटीएस अधिकारी , आय बी , बॉम्ब स्कॉड व सीआयडी अधिकारी व तळोजा पोलीस घटनास्थळी धावून आले. मात्र हि स्फोटके निर्जीव असल्याचे तळोजा पोलिसांनी सांगितले. तळोजा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
गेल्या सलग तीन दिवसातली हि तिसरी घटना असून आजच्या या प्रकाराने एकाच खळबळ उडालेली आहे. काल पनवेल जे एन पी टी मार्गावर जाणाऱ्या रेल्वे रुळावर रेल्वे रुळाच्या मध्य बाजूला असणारा लोखंडी खांब आडवा ठेवल्याचा प्रकार घडलेला होता तर कळंबोली रेल्वे रुळावर ११० किलो वजनाचा लोखंडी रेल्वे रुळाचा तुकडा ठेवण्याच्या घटना ताज्या असताना आज हा गंभीर प्रकार घडलेला आहे. याप्रकरणी योग्य कारवाई होण्याची गरज आहे. (वार्ताहर)