पनवेल : महागाईच्या काळात ‘ब्रॅँडेड’ औषधांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर चालल्या आहेत. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना ‘जेनेरिक’ औषधे मोफत उपलब्ध करून देणे खरोखरच समाजोपयोगी काम असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्टकडून सेक्टर १२ येथे सुरू करण्यात आलेल्या जेनेरिक औषध केंद्राचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खारघरचा राजा ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील, जादूगार सतीश देशमुख, रामजीभाई बेरा पटेल, गीता चौधरी आदी उपस्थित होते.जेनेरिक औषधांची कोठेही जाहिरात केली जात नाही. परंतु बहुतांशी सर्वच रोगांवर जेनेरिक औषधे उपलब्ध असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. ज्यावेळी शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
जेनेरिक औषधे गुणकारी
By admin | Published: February 14, 2017 4:27 AM