घणसोलीत आरोग्य तपासणी शिबिर
By admin | Published: May 11, 2017 02:18 AM2017-05-11T02:18:21+5:302017-05-11T02:18:21+5:30
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने घणसोली येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने घणसोली येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लहान मुलांसह महिला व पुरु षांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय उपस्थितांनी मोठ्या संख्येने रक्तदान देखील केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी तसेच शिवसाई मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हे शिबिर भरवण्यात आले होते. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. परंतु अनेकजण किरकोळ व्याधींकडे दुर्लक्ष करत डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात. ही बाब लक्षात घेऊन हे शिबिर भरवल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील यांनी सांगितले. या शिबिराचे उद्घाटनप्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, राजेश पाटील, नगरसेविका उषा पाटील आदी उपस्थित होते. यावेळी लहान मुलांसह महिला व पुरु षांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याशिवाय रक्तगट तपासणी, रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले. त्यामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्याशिवाय डोळ्यांची तपासणी करून दृष्टिदोष आढळून आलेल्यांना डोळ्यांची निगा कशी राखावी याविषयी मार्गदर्शन केले.