आमिष दाखवून मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:36 AM2017-08-06T00:36:43+5:302017-08-06T00:36:51+5:30
वाशी परिसरामध्ये भीक मागणा-या अल्पवयीन मुलीला खाऊ देण्याच्या आमिषाने पळवून नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी वाशी
नवी मुंबई : वाशी परिसरामध्ये भीक मागणा-या अल्पवयीन मुलीला खाऊ देण्याच्या आमिषाने पळवून नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी वाशी रुग्णालयात नेले असून, या प्रकरणी तुर्भे इंदिरानगर परिसरात राहणारा आरोपी, धर्मान्ना यलप्पा कुंतोजीला पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित मुलगी व तिचा पाच वर्षांचा भाऊ वाशी परिसरामध्ये भीक मागून उदरनिर्वाह करीत होते. ३ आॅगस्टला येथील बिकानेर परिसरामध्ये भीक मागत फिरत असताना, वॅगनआर कारमधून आलेल्या धर्मान्ना कुंतोजीने त्या दोघांना ५०० रुपये व खाऊ देतो, असे सांगून कारमध्ये बसविले. त्यांना दगडखाण परिसरामध्ये घेऊन गेला व तेथे मुलीवर अतिप्रसंग केला. घटनेनंतर आरोपीने मुलगी व तिच्या भावाला दगडखाणीमध्ये ठेवून तेथून पळून गेला. घाबरलेल्या मुलीला नागरिकांनी वाशी रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी तिला उपचारासाठी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठविले. तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्यानंतर पोलिसांनी याविषयी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त प्रशांत बुरडे व पोलीस उपआयुक्त सुधाकर पठारे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व त्यांच्या सहकाºयांनी तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही व तांत्रिक बाबीवरून तपास करून, आरोपी धर्मान्ना कुंतोजीला अटक केली व कारही जप्त केली आहे.
- ३ आॅगस्ट रोजी वॅगनआर कारमधून आलेल्या धर्मान्ना कुंतोजीने अल्पवयीन मुलीला व तिच्या भावाला ५०० रुपये व खाऊ देतो, असे सांगून कारमध्ये बसविले. त्यांना दगडखाण परिसरामध्ये घेऊन गेला व तेथे मुलीवर अतिप्रसंग केला.