हेक्टरी पन्नास हजार द्या!

By admin | Published: July 18, 2015 11:26 PM2015-07-18T23:26:55+5:302015-07-18T23:26:55+5:30

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे व पेरण्यांचा कालावधीही निघून गेला असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या

Give fifty thousand of hectare! | हेक्टरी पन्नास हजार द्या!

हेक्टरी पन्नास हजार द्या!

Next

वाडा : पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे व पेरण्यांचा कालावधीही निघून गेला असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने वाड्याच्या तहसिलदारांकडे केली आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया गेल्या आहेत. तसेच दुबार पेरणी करायला बियाणे नसल्याने व आर्थिक अडचण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
बि-बीयाणे व खते खरेदी करण्यासाठी बँका व सहकारी सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहीला आहे. (वार्ताहर)

विक्रमगडमध्ये गरवार भातरोपणीस विलंब
विक्रमगड तालुक्यात पावसाने यंदा जूनच्या पहिल्याच आठवडयात हजेरी लावली खरी मात्र त्यानंतर पावसाने शेतकऱ्यांना नुसती हुलकावणी दिल्याने नांगरीसह भातपेरणीची कामे खोळंबली. पावसाचे काही खरे नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे अटपती घेतली आहेत. जुनच्या अखरेपर्यत हळवार भातरोपणीची कामे पुर्ण होऊन जुलै पंधरवडयापर्यत गरवार भातरोवणीची कामेही आटपट असतात. मात्र यंदा शेतामध्ये रोपणीसाठी पाणीच साठत नसल्याने हाळव्या भातरोपणीची कामे दयापही अपुर्ण आहेत़ त्यामुळे गरवार भातरोपणीस विलंब होत आहे़
आजमितीस शेतकरी जुलै अखेर लागवडीचे कामे पुर्ण करीत असतो, मात्र मुबलक पाऊस न झाल्याने लावणीची कामे पुर्ण झालेली नाही़ आज ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी लागवडची कामे पुर्ण केली आहेत. पावसाने पाठ दाखविल्याने शेतीसाठी लागणारे मजुर, खते, बि-बीयाणांच्या किंमती वाढत आहेत त्यामुळे बळीराज पुरता मेटाकुटीला आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आहे.
दुबार पेरणी अशक्य असल्याने एकरी २५०००/- नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी, भुसंपादन कायदा रद्द करावा, सुका दुष्काळ जाहीर करावा़, आदी मागण्या पाटील यांनी केल्या आहेत.

दुष्काळ जाहीर करा : राष्ट्रवादीची मागणी
वाडा तालुक्यात पेरण्यांच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुबार पेरण्यांसाठी आर्थिक पाठबळ नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत.
पाऊस झाला तरी भात लागवडीचा कालावधी निघून गेला आहे. त्यामुळे या वर्षी भातशेती होऊ शकत नसल्याने सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी काँगे्रसच्या
वतीने तहसीलदारांकडे केली आहे.

Web Title: Give fifty thousand of hectare!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.