शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

हेक्टरी पन्नास हजार द्या!

By admin | Published: July 18, 2015 11:26 PM

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे व पेरण्यांचा कालावधीही निघून गेला असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या

वाडा : पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे व पेरण्यांचा कालावधीही निघून गेला असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने वाड्याच्या तहसिलदारांकडे केली आहे.पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया गेल्या आहेत. तसेच दुबार पेरणी करायला बियाणे नसल्याने व आर्थिक अडचण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बि-बीयाणे व खते खरेदी करण्यासाठी बँका व सहकारी सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहीला आहे. (वार्ताहर)विक्रमगडमध्ये गरवार भातरोपणीस विलंबविक्रमगड तालुक्यात पावसाने यंदा जूनच्या पहिल्याच आठवडयात हजेरी लावली खरी मात्र त्यानंतर पावसाने शेतकऱ्यांना नुसती हुलकावणी दिल्याने नांगरीसह भातपेरणीची कामे खोळंबली. पावसाचे काही खरे नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे अटपती घेतली आहेत. जुनच्या अखरेपर्यत हळवार भातरोपणीची कामे पुर्ण होऊन जुलै पंधरवडयापर्यत गरवार भातरोवणीची कामेही आटपट असतात. मात्र यंदा शेतामध्ये रोपणीसाठी पाणीच साठत नसल्याने हाळव्या भातरोपणीची कामे दयापही अपुर्ण आहेत़ त्यामुळे गरवार भातरोपणीस विलंब होत आहे़ आजमितीस शेतकरी जुलै अखेर लागवडीचे कामे पुर्ण करीत असतो, मात्र मुबलक पाऊस न झाल्याने लावणीची कामे पुर्ण झालेली नाही़ आज ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी लागवडची कामे पुर्ण केली आहेत. पावसाने पाठ दाखविल्याने शेतीसाठी लागणारे मजुर, खते, बि-बीयाणांच्या किंमती वाढत आहेत त्यामुळे बळीराज पुरता मेटाकुटीला आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी सरकारकडे मागणी केली आहे.दुबार पेरणी अशक्य असल्याने एकरी २५०००/- नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी, भुसंपादन कायदा रद्द करावा, सुका दुष्काळ जाहीर करावा़, आदी मागण्या पाटील यांनी केल्या आहेत. दुष्काळ जाहीर करा : राष्ट्रवादीची मागणीवाडा तालुक्यात पेरण्यांच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुबार पेरण्यांसाठी आर्थिक पाठबळ नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. पाऊस झाला तरी भात लागवडीचा कालावधी निघून गेला आहे. त्यामुळे या वर्षी भातशेती होऊ शकत नसल्याने सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने तहसीलदारांकडे केली आहे.