सिडकोची वाशीसह जुईनगरची घरे माथाडी कामगारांना द्या; आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी
By नामदेव मोरे | Published: September 25, 2023 12:50 PM2023-09-25T12:50:32+5:302023-09-25T12:50:44+5:30
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील कांदा मार्केट मध्ये माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
नवी मुंबई: सिडको वाशीतील ट्रक टर्मीनल व जुईनगर रेल्वे स्टेशन समोर घरे बांधत आहे. या प्रकल्पातील घरे माथाडी कामगारांना द्यावी अशी मागणी माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील कांदा मार्केट मध्ये माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळेस शिंदे यांनी माथाडी कायद्याचा दुरूपयोग करणारांवर कारवाई करावी. कायदा टिकला पाहिजे.कायद्यातील त्रुटी दूर कराव्या अशी मागणी केली. नवी मुंबईत सिडको बांधत असलेल्या वाशी व जुईनगर येथील घरे कामगारांना देण्यात यावीत. कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली.
नाशिक मधील कामगारांचा 135 कोटीचा प्रश्न सोडवा
नाशिक मधील माथाडी कामगारांच्या लेव्हीचे 135 कोटी रूपये व्यापा-यांकडे प्रलंबित आहेत. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. पण व्यापारी पैसे देत नाहीत. सरकारनेही सहकार्य करावे. आम्ही कामगारांचे पैसे मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.