शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

देवीच्या पूजेच्या बहाण्याने लुटले सोने; संकट टाळण्यासाठी भंडारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 3:24 AM

कुटुंबावरील संकट टाळण्याकरिता देवीचा भंडारा घालण्याच्या बहाण्याने सोने लुटल्याचा प्रकार एपीएमसीत घडला आहे. या प्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : कुटुंबावरील संकट टाळण्याकरिता देवीचा भंडारा घालण्याच्या बहाण्याने सोने लुटल्याचा प्रकार एपीएमसीत घडला आहे. या प्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पूजेच्या बहाण्याने सोन्याचे दागिने देवीसमोर ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखीने चोरून नेले.एपीएमसी येथील हिमानी जैन (२७) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्या बदलापूरच्या राहणाऱ्या असून, एपीएमसी सेक्टर १९ येथे अकाउंटंट म्हणून नोकरी करतात. गुरुवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे कार्यालयात आल्या असता, दोन पुजारी त्यांच्या कार्यालयात आले. त्यांनी जैन यांना देवीच्या भंडाºयासाठी पैशांची मागणी केली; परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्या दोघांपैकी एका व्यक्तीने परत त्यांच्या कार्यालयात जैन यांच्या कुटुंबाविषयी माहिती देण्यास सुरुवात केली. यामुळे जैन यांचा त्याच्या भाकितावर विश्वास बसू लागल्यानंतर त्या व्यक्तीने जैन यांना त्यांच्या कुटुंबीयांवर संकट असल्याचे सांगितले. हे संकट दूर करण्यासाठी देवीचा भंडारा घालतो, असे सांगून सदर व्यक्तीने जैन यांच्याकडे ११ हजार रुपयांची मागणी केली; परंतु तेवढे पैसे नसल्याने जैन यांनी सांगितल्याने सदर भामट्याने त्यांना १०० रुपयांत पूजा करून देतो, असे सांगितले. त्याकरिता अंगावरील सोन्याचे दागिने पूजेसाठी देवीपुढे ठेवायला सांगितले. त्यानुसार जैन यांनी अंगठी व चेन असा सुमारे २५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज देवीच्या प्रतिमेपुढे ठेवला होता. या वेळी भामट्याने काही मिनिटे पूजा केल्यानंतर ते दागिने कागदात गुंडाळून देवीच्या प्रतिमेपुढे ठेवून अर्ध्या तासाने घेण्याचे सुचवले. ही पूजा संपल्यानंतर जैन यांनी त्यास पूजेची दक्षिणा म्हणून १०० रुपये दिले असता, त्याने ५० रुपये परत देऊन गेल्यानंतर जैन यांनी कागदी पुडीतले दागिने तपासले असता त्यामध्ये ते आढळले नाहीत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई