उत्साहात रंगला लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 02:48 AM2018-10-21T02:48:31+5:302018-10-21T02:48:34+5:30

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रस्तुत ‘लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरणाचा सोहळा शनिवारी फडके नाट्यगृहात संपन्न झाला.

Golma Lokmat Adarsh ​​Teacher Award Ceremony | उत्साहात रंगला लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

उत्साहात रंगला लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

Next

पनवेल : श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रस्तुत ‘लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरणाचा सोहळा शनिवारी फडके नाट्यगृहात संपन्न झाला. तालुक्यातील ४० शाळांमधील ४२ गुणवंत शिक्षकांचा या वेळी गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षकांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदाचे तिसरे वर्ष होते. शाळेतील अंतर्गत समितीने सुचविलेल्या ४२ शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पनवेलमधील नृत्य आर्ट डान्स सेंटर व कामोठेमधील सुषमा पाटील विद्यालय कामोठ्याच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला उपस्थितांनी दाद दिली. ‘लोकमत’ ज्या प्रकारे शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करीत आहे, त्याच प्रकारे ‘लोकमत’लाही आदर्श वर्तमानपत्र म्हणून गौरविण्याची गरज असल्याचे मत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केले.
गुणवंत शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. खासदार असताना दिल्लीमध्ये आवर्जून ‘लोकमत’ वाचत असल्याच्या आठवणींनाही या वेळी त्यांनी उजाळा दिला. तर या कार्यक्रमामुळे मला माझ्या शाळेची आठवण झाली. त्यामुळे ‘लोकमत’चा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी या वेळी व्यक्त केले. यांनी बोलताना सांगितले की ‘लोकमत’च्या मार्फत आयोजित या स्तुत्य उपक्रमात मला सहभागी होता आले, हे माझे भाग्य असल्याचे न्यू इंग्लिश पळस्पेचे संस्थापक बाळाजी घुमे या वेळी म्हणाले. ‘लोकमत’ व श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे विशेष अभिनंदन केले.
या सोहळ्यात मी सहभागी झालो नसतो तर मी आयुष्यात मोठी चूक केली असती, अशी प्रतिक्रिया कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी या वेळी व्यक्त केली. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला घडविणारा शिक्षक असतो, याचे भान ‘लोकमत’ने ठेवून शिक्षकांचा सन्मान केला, ही बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पाटील यांनी या वेळी काढले.
सविस्तर वृत्त /३

Web Title: Golma Lokmat Adarsh ​​Teacher Award Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.