शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

शहरातील नाका कामगारांना अच्छे दिन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 11:53 PM

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे शहरातील नाका कामगारांना अच्छे दिन आले आहेत.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे शहरातील नाका कामगारांना अच्छे दिन आले आहेत. प्रचाराच्या कामात या कष्टकरी मजूर वर्गाचा राजकीय पक्षांना विविध स्तरावर चांगलाच उपयोग होतो. त्यामुळे सध्या या कामगारांचा भाव वधारल्याचे चित्र आहे. याचा परिणाम म्हणून सकाळच्या वेळी नेहमी गजबजून जाणारे कामगार नाके मागील काही दिवसांपासून ओस पडले आहेत.नवी मुंबई शहरात दहा ते पंधरा ठिकाणी प्रमुख कामगार नाके आहेत. त्याशिवाय लहान-मोठ्या चौकात दरररोज सकाळी रोजंदारीच्या शोधात कामगारांचा मेळा भरतो. ढोबळ अंदाजानुसार नवी मुंबईत पाच ते सहा हजार नाका कामगार आहेत. यात परप्रांतीयांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. यातील प्रत्येकाला दरदिवशी रोजगार मिळतोच असे नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे यातील प्रत्येकाला आता रोजगाराची हमी मिळाली आहे. पुढील काही दिवस तरी रोजगाराचा प्रश्न मिटल्याने या कामगारांत आनंदाचे वातावरण आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात खरी चुरस असणार आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. प्रचार फेऱ्या काढून मतदारांशी संवाद साधला जात आहे. उपाशीपोटी प्रचारात झोकून देणारे कार्यकर्ते आता कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रचारासाठी आता नाका कामगारांची गरज भासू लागली आहे. प्रचाराची पत्रके वाटणे, फलक व होर्डिंग लावणे, गर्दी वाढविणे, घोषणा देणे आदी कामांसाठी बहुतांशी नेत्यांची भिस्त नाका कामगारांवर असल्याचे दिसून येते. त्यातल्या त्यात प्रचाराच्या रॅलीसाठी महिला कामगारांना अधिक पसंती असल्याचे समजते. प्रचार कामात सहभागी होणाºया पुरुष कामगाराला दिवसाला किमान ५00 तर महिला कर्मचाºयाला ३00 रुपये मिळतात. त्याशिवाय नाष्टा, दोन वेळचे जेवण व प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. दिवसभराच्या प्रचारानंतर रात्रीच्या सभेसाठी अतिरिक्त मानधन दिले जाते, अशी माहिती एका कामगाराने दिली. बांधकामासाठी कामगार पुरविणारे कंत्राटदारच नाका कामगार आणि नेते यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रचाराच्या वेळापत्रकानुसार या कामगारांना निश्चित ठिकाणांवर सोडण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते.>बांधकामांसाठी मजुरांचा तुटवडाशहरातील बहुतांशी कामगार सध्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या अनेक बांधकाम प्रकल्पांना मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. कामगार नाक्यावर पुरुष व महिला मजूर, गवंडी, रंगारी, सुतार, प्लंबर आदी घटकांतील कामगार रोजंदारीसाठी उभे असतात. यातील मजूर वगळता उर्वरित घटकांची दैनंदिन रोजंदारी ८00 ते १000 रुपयांच्या घरात आहे. प्रचाराच्या कामासाठी ३00 ते ५00 रुपये इतकेच मानधन मिळत असल्याने हा घटक निवडणूक प्रचारात सहभागी होण्यास फारसा उत्सुक नसतो.>प्रमुख कामगार नाकेदिघा (महापालिका तलाव), ऐरोली नाका, नोसिल नाका, घणसोली (दगडू चाहू पाटील चौक), कोपरी गाव (हनुमान मंदिर सर्कल), कोपरखैरणे (रांजणदेवी चौक), कोपरखैरणे (सेक्टर ६), वाशी (सेक्टर १५), नेरूळ (एलपी सिग्नल) ही शहरातील काही प्रमुख कामगार नाके आहेत. मागील आठ दिवसांपासून या नाक्यांवरील कामगारांची संख्या रोडावल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019