पनवेल : लोकसभा निवडणूक हा भारतातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव म्हणून संबोधले जाते. देशाचे भवितव्य या निवडणुकीच्या मतदानातून ठरत असते. याच दृष्टीने निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी दृष्टीने स्वीप कार्यक्रम राबवत मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. पनवेल मध्ये 544 मतदान केंद्र आहेत. पनवेल विधानसभा क्षेत्रात 530 बीएलवो मार्फत घरोघरी जाऊन मतदान स्लिप (वोटरस्लिप) वितरित करण्यात येणार आहे.
या स्लिपवर मतदाराचे नाव, मतदानाची तारीख, केंद्राचे नाव आणि विशेष म्हणजे मतदान केंद्राचे गुगल लोकेशन असणार आहे. गुगल लोकेशनद्वारे मतदारांना थेट मतदार केंद्रावर पोहचणे शक्य होणार आहे. प्रथमच हा प्रयोग राबविण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग देखील हायटेक पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवत आहे.पनवेल मध्ये 5 लाख 91 हजारांच्या आसपास मतदार आहेत. या सर्व मतदारांना घरपोच वोटर स्लिप पोच केली जाणार आहे. मतदानाच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी या सर्व वोटर स्लिप मतदारांपर्यंत पोच झालेल्या असतील, अशी माहिती पनवेलचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.
मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोग जनजागृती करीत आहे. बॅनर्स होर्डिंग्सद्वारे मतदान करण्याचे अवाहन केले जात आहे.भारतरत्न मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे लागलेले बॅनर्स पनवेल मध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. पनवेल मध्ये 544 मतदान केंद्रांपैकी 332 क्रमांकाचा मतदान केंद्राची दुरा महिला कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असणार आहे.पनवेल शहरातील वाजेकर स्कुल मधील या केंद्रावर सर्व महिला कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
शहरात राहणाऱ्या मतदारांना मुख्यत्वे करून मतदान केंद्र शोधण्यासाठी अडचणी येत असतात. आपण राहत असलेल्या परिसरापेक्षा इतरत्र मतदान केंद्र आपल्यास ते शोधन्यास काही वेळा कसरत करावी लागते. यावर्षी गुगल लोकेशन वोटर स्लिपवर असल्याने सहजरित्या मतदान केंद्रावर पोहचणे शक्य होणार आहे.
गुगल लोकेशनचा अंतर्भाव वोटर स्लिप वर करण्यात आला आहे.यामुळे मतदार केंद्रावर पोहचणे मतदाराना सहजरीत्या शक्य होणार आहे.- राहुल मुंडके (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,पनवेल)