५० चे १५० मिळाले अन २१ लाख गमावले, दामदुप्पट पडली महागात, इंजिनिअरची ऑनलाईन फसवणूक
By सूर्यकांत वाघमारे | Published: August 11, 2023 10:20 PM2023-08-11T22:20:14+5:302023-08-11T22:20:33+5:30
Navi Mumbai: नेरूळमध्ये राहणाऱ्या इंजिनिअर तरुणाची २१ लाख ५७ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. ठराविक रक्कम गुंतवून दामदुप्पट नफा मिळवण्याच्या अमिषाला भुलून त्याच्यासोबत हा प्रकार घडला आहे.
नवी मुंबई - नेरूळमध्ये राहणाऱ्या इंजिनिअर तरुणाची २१ लाख ५७ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. ठराविक रक्कम गुंतवून दामदुप्पट नफा मिळवण्याच्या अमिषाला भुलून त्याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरेश क्षीरसागर असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला इंस्टाग्रामवर अधिकाधिक नफा कमवणाऱ्या व्यवसायाचा मॅसेज आला होता. त्यावर प्रतिसाद देऊन त्याने ५० रुपये गुंतवले होते. त्या बदल्यात त्याला १५० रुपये मिळाल्याने त्याचा संबंधितांवर विश्वास बसला. यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून टप्प्या टप्प्याने त्याने तब्बल २१ लाख ५७ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर मात्र त्याला कोणताही नफा मिळण्या ऐवजी संबंधितांकडून अधिक रकमेची मागणी होऊ लागली. शिवाय पैसे न भरल्यास धमक्या देखील दिल्या जाऊ लागल्या. यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली. त्याद्वारे गुरुवारी नेरुळ पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.