शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था

By admin | Published: April 01, 2017 11:48 PM

पनवेल महापालिका हद्दीतील जुना ठाणा नाका रस्त्यावरील सरकारी वसाहतीची दुरवस्था झाली असून, या ठिकाणी ५२ कुटुंबे रामभरोसे राहत आहेत.

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील जुना ठाणा नाका रस्त्यावरील सरकारी वसाहतीची दुरवस्था झाली असून, या ठिकाणी ५२ कुटुंबे रामभरोसे राहत आहेत. सरकारी कर्मचारी असल्याने कुणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या वसाहतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मोडकळीस आलेल्या इमारती, परिसरात अस्वच्छतेबरोबरच पाण्याच्या टाक्यांची दैना झाली असून, संरक्षण भिंतीचा तर पत्ताच नाही. ड्रेनेज लाइन तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे, शिवाय दुर्गंधीही पसरली आहे. भटक्या प्राण्यांचा वावर आदी समस्यांमुळे परिसरातील कुटुंबे त्रस्त असून याप्रकरणी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. रायगड जिल्हा परिषदेचा कर्मचारीवर्ग राहत असलेल्या पनवेल येथील शासकीय वसाहतीत सहा इमारतींत द्वितीय श्रेणी अधिकाऱ्यांच्या २, चतुर्थ श्रेणी अधिकाऱ्यांच्या ६ आणि तृतीय श्रेणी अधिकाऱ्यांच्या ३४ व इतर अशा एकूण ५२ खोल्या आहेत. मात्र, वसाहतीच्या दुरवस्थेमुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. दुरवस्थेबाबत परिसरातील तरुण संबंधित विभागाकडे तक्रार करण्यासाठी गेले असता, राहायचे तर राहा, नाहीतर निघून जा, असे उत्तर दिले जाते. गेल्या पाच वर्षांत इमारतीला रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. येथील पाण्याची टाकी इतकी धोकादायक झाली आहे की कधीही कोसळू शकते. इमारतीला तडे गेले आहेत. रहिवाशांनी स्वखर्चाने पंपहाउस दुरुस्तीचे तसेच ड्रेनेजचे काम केले आहे. मात्र वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने गेल्या महिन्यात पंपहाउसची वीज खंडित केल्याचे समजते. येथील इमारतींच्या जिन्यावर विजेची व्यवस्था नाही. वसाहतीत धूरफवारणी होत नसल्याने डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. वसाहतीला संरक्षण भिंत नसल्याने भटके प्राणी, फेरीवाल्यांचा सर्रास वावर असतो. पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्याही याच परिसरात उभ्या असतात. या वसाहतीला पालिकेकडून दिवसातून अर्धा तास पाणी दिले जाते. येथे नळजोडण्या वाढवण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.