कळंबोली : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दारूबंदीचा ठराव संमत करून काही महिने उलटले तरी सुद्धा याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. ठराव करणारे सत्ताधारी आणि ते करण्यास भाग पाडणाºया विरोधकांना या विषयाचा विसर पडला की काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे दारूबंदीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून आहे.खारघर नोडमध्ये सुरुवातीपासून दारूबंदीकरिता आंदोलन झाले. या ठिकाणी सुरू करण्यात आलेले दारूचे दुकान बंद करण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते. आजही खारघरमध्ये दारूविरोधात लढा सुरू आहे. एज्युकेशन हब म्हणून नावलौकिक असलेल्या खारघरमध्ये दारूचे दुकान, बीअर बार नाहीत. पनवेल शहरातही दारूबंदीचा प्रस्ताव पनवेल महापालिकेच्या महासभेत उपस्थित करण्यात आला, परंतु या प्रस्तावावर साधी चर्चाही झाली नाही. डिसेंबर महिन्यातील महासभेत दारूबंदीचा ठराव संमत केला. या निर्णयाचे सर्व पातळीवरून स्वागत झाले. दारूबंदी करणारी राज्यातील पहिला महापालिका असल्याचे सांगत अनेकांनी पाठ थोपवून घेतली. मनपाने केलेला ठराव प्रशासनाने जिल्हाधिकारी, नगरविकास विकास, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठवल्याचे समजते. यावर शासनाकडून निर्णय आल्यावरच दारूबंदीची अंमलबजावणी होणार आहे.दारूबंदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हाधिकाºयांकडून मतदान घेतले जाईल. त्यानंतर महापालिका क्षेत्रात दारूबंदी केली जाईल.- जमीर लेंगरेकर,उपायुक्त, पनवेल महापालिका
पनवेलमधील दारूबंदीचा ठराव शासन दरबारी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:55 AM