रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पदवी दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:27 AM2020-02-06T00:27:26+5:302020-02-06T00:27:42+5:30
नेरुळ येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील किंडरगार्टन विद्यार्थ्यांसाठी पदवी दिवस साजरा करण्यात आला.
नवी मुंबई : नेरुळ येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील किंडरगार्टन विद्यार्थ्यांसाठी पदवी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी बालवाडीतून प्राथमिक विभागात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. आयुष्यातील पहिली पदवी घेताना विद्यार्थ्यांच्या चेहºयावर वेगळाच आनंद दिसून येत होता.
यावेळी विविध सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात छोट्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मॉन्टेसरीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. रंगबिरंगी पोशाख परिधान करून या चिमुकल्यांनी नृत्य व इतर कलांचे प्रभावीपणे सादरीकरण केले.
एडी पेंग्विनने जगाला वाचविले, या संगीतमय कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमानंतर पदवीदान सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. मॉन्टेसरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पदवीधर वेशभूषा करून पदवीचा स्वीकार केला. या वेळी विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्त्व या विषयावर नृत्य सादर केले.