शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

वेतनवाढीत प्राथमिक शिक्षकांचा समावेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 1:19 AM

महापालिका प्रशासनाने बालवाडी शिक्षिका, मदतनीस, माध्यमिक शिक्षक व शिक्षण सेवकांना वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने बालवाडी शिक्षिका, मदतनीस, माध्यमिक शिक्षक व शिक्षण सेवकांना वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. १९ जानेवारीला होणाºया सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. वेतनवाढीमधून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले आहे. ठोक मानधनावरील शिक्षकांनाही २० हजार रुपये मानधन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ५३ बालवाडी वर्ग व १७ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. यामध्ये ११६ बालवाडी शिक्षिका, १११ मदतनीस, ३२ माध्यमिक शिक्षक व ३१ शिक्षण सेवक कार्यरत आहेत. या सर्वांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता; परंतु सभा तहकूब झाल्यामुळे त्यावर निर्णय होवू शकलेला नाही. सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव चर्चेसाठी येणार आहे. महापालिका शाळांमध्ये २०११ पासून ठोक मानधनावरील शिक्षक कार्यरत आहेत. सुरवातीला ५ हजार रुपये मानधनावर या शिक्षकांनी विद्यादानाचे काम केले. शाळेतील साफसफाई कामगारांपेक्षाही त्यांना कमी वेतन देण्यात येत होते. सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेला पाठपुरावा व प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे शिक्षकांना १२ हजार रुपये मानधन करण्यात आले आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये नवी मुंबईमध्ये वाढलेले घरभाडे व महागाईमुळे या वेतनामध्ये घरखर्च चालविणे जवळपास अशक्य होत आहे. यामुळे प्रशासनाने माध्यमिक शिक्षक व शिक्षण सेवकाप्रमाणे २० हजार रुपये मानधन करावे अशी विनंती शिक्षकांनी केली आहे. याविषयी आयुक्तांसह लोकप्रतिनिधींनाही विनंती केली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये याविषयी काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.