मुंबईसह नवी मुंबईला धान्यपुरवठा पूर्ववत सुरू, बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 01:24 AM2020-12-10T01:24:32+5:302020-12-10T01:24:53+5:30
केंद्र शासनाच्या नवीन कृषी व कामगार कायद्यांमुळे बाजार समित्यांचे अस्तीत्व धोक्यात येणार असल्याची भावना कामगार व व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे मंगळवारी आयोजित ‘भारत बंद’मध्ये मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापारी, कामगार, वाहतूकदार सहभागी झाले होते.
नवी मुंबई : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बुधवारी पाचही मार्केट पूर्ववत सुरू झाले असून, दिवसभरात १,३४४ वाहनांची आवक झाली. मुंबई व नवी मुंबईमधील व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.
केंद्र शासनाच्या नवीन कृषी व कामगार कायद्यांमुळे बाजार समित्यांचे अस्तीत्व धोक्यात येणार असल्याची भावना कामगार व व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे मंगळवारी आयोजित ‘भारत बंद’मध्ये मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापारी, कामगार, वाहतूकदार सहभागी झाले होते. पाचही मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला हाेता. शंभर टक्के व्यवहार बंद होेते. बुधवारी मार्केट पूर्ववत सुरू झाले आहेत. आवक कमी असली, तरी मुंबई व नवी मुंबईमधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुन्हा सुुरू झाला आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये १५९ वाहनांमधून १,८४५ टन कांदा, बटाटा व लसणीची आवक झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये ५६२ ट्रक, टेंपोमधून २,७५३ टन भाजी व २ लाख ५७ हजार जुडी पालेभाज्यांची आवक झाली आहे. धान्य मार्केटमध्ये ६ हजार टन अन्नधान्याची आवक झाली आहे. बाजार समितीमधील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू असल्याची माहिती सचीव अनिल चव्हाण यांनी दिली.
पाचही मार्केटमध्ये मंगळवारी व्यवहार पूर्र्णं बंद होेते. बुधवारी मार्केट पूर्ववत सुरू झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुन्हा सुुरू झाला आहे.