ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उरण-पनवेलमधील ४३ शस्त्रपरवाना धारकांना शस्त्र जमा करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 10:26 PM2022-12-09T22:26:42+5:302022-12-09T22:27:37+5:30
उरण तालुक्यातील १७ आणि पनवेल तालुक्यातील २३ अशा एकूण ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ डिसेंबर रोजी होणार आहेत.
मधुकर ठाकूर
उरण : नवी मुंबई पोलिस आयुक्त हद्दीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण, पनवेल, नवीन पनवेलमधील ४३ शस्त्रपरवाना धारकांना बंदुक, पिस्तूल पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.
उरण तालुक्यातील १७ आणि पनवेल तालुक्यातील २३ अशा एकूण ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ डिसेंबर रोजी होणार आहेत. मतदानानंतर २० डिसेंबर रोजी मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. मतदान आणि मतमोजणी दरम्यान कुठेही शांतता भंग होणार नाही आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून उरण आणि पनवेल तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या ४३ शस्त्रपरवाना धारकांना आपल्याकडील बंदुक, पिस्तूल पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.
यामध्ये उरण-१३, पनवेल-७ आणि नवीन पनवेलमधील २३ अशा एकूण ४३ शस्त्रपरवाना धारकांना बंदुक, पिस्तूल पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी पोलिसांनी नोटीसा बजावल्या आल्या आहेत. यापैकी बहुतांश शस्त्र परवानाधारकांनी आपापली शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा केली आहेत.उर्वरित शस्त्रे जमा करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"