- वैभव गायकरपनवेल : पालिका मुख्यालयाच्या आराखड्याला नुकतीच महासभेने मंजुरी दिली आहे. तळमजला अधिक सहामजली या मुख्यालयाच्या उभारणीसाठी सुमारे १५० कोटींचा खर्च अपेक्षित असून आराखड्यानुसार ३ लाख ६२ हजार स्क्वेअर फूट जागा या मुख्यालयासाठी असणार आहे.पनवेल महानगरपालिकेचे मुख्यालय नवीन पनवेल सेक्टर १६ मधील भूखंड क्रमांक ४वर उभे राहाणार आहे. काळसेकर कॉलेज, तसेच कर्नाळा स्पोटर््स अकॅडमीजवळ हे मुख्यालय असणार आहे. या भूखंडासाठी पालिकेने सिडकोला सुमारे २८ कोटी रुपये अदा केले आहेत.स्थायी आणि महासभेच्या मंजुरीमुळे मुख्यालय उभारणी प्रक्रियेला वेग येणार आहे. या मुख्यालयात सर्वात वरच्या सहा मजल्यावर पनवेलचे इतिहास उलगडणारे भव्य असे संग्रहालय असणार आहे. पूर्णत: वातानुकूलित असलेल्या या मुख्यालयात नैसर्गिक हवा खेळती राहावी, तसेच नैसर्गिक प्रकाश पडेल, याबाबत विशेष खबरदारी या मुख्यालयाच्या सल्लागार व वास्तुविशारद कंपनीमार्फत घेतली गेली आहे. मुख्यालयाचा आराखडाही सार्वजनिक करण्यात आला आहे.कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीजवळ स्थापनाप्राथमिक स्वरूपात या मुख्यालयाच्या उभारणीला हिरवा कंदील मिळाला असला, तरी प्रत्यक्षात मुख्यालयाच्या उभारणीला सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मुख्यालय उभारणीच्या पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नकाशे, आराखडे मंजुरीनंतर आयआयटी मुंबईच्या माध्यमातून जागेची पाहणी केली जाईल.त्यानंतर, सविस्तर अंदाजपत्र तयार केले जाईल. पुन्हा महासभेपुढे हा अंदाजपत्र मंजुरीसाठी गेल्यानंतर मुख्यालयाच्या बांधकामासाठी निविदा प्रकाशित केली जाईल, अशी माहिती शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली.कर्नाळा स्पोटर््स अकॅडमीजवळ हे मुख्यालय असणार आहे. या भूखंडासाठी पालिकेने सिडकोला सुमारे २८ कोटी रुपये अदा केले आहेत.पनवेलचा इतिहास उलगडणारे संग्रहालय : या मुख्यालयात सर्वात वरच्या सहाव्या मजल्यावर पनवेलचा इतिहास उलगडणारे भव्य असे संग्रहालय असणार आहे. या संग्रहालयात पनवेलची जडणघडण ऐतिहासिक वास्तूंची माहिती असणार आहे.२५० वाहनांचे पार्किंग : त्या व्यतिरिक्त २५० वाहनांची पार्किंगची व्यवस्था तळमजल्यात असणार आहे. २०० आसन व्यवस्था असलेले सभागृह, सभापतीसाठी दालने, मीटिंग हॉल, उपहारगृह, पत्रकार कक्षाचा या मुख्यालयात समावेश असणार आहे.
पनवेलमध्ये उभे राहणार पालिकेचे भव्य मुख्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 11:53 PM