पनवेलमध्ये साजरा झाला आजी-आजोबा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 03:07 AM2019-02-18T03:07:39+5:302019-02-18T03:08:28+5:30
शाळेच्या मुख्याध्यापीका अंजली उºहेकर आणि मनिषा पाटील, तसेच पर्यवेक्षीका मानसी कोकीळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन होऊन कार्यक्रमाला सुरूवात झाली.
नवी मुंबई : शहरीकरण आणि लघु कुटुंबपद्धतीच्या आजच्या जमान्यात आजी-आजोबा हे नाते दुरावले आहे. मात्र, हे दुरावलेले नाते घट्ट करण्यासाठी पनवेल येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर शाळेतर्फे शनिवारी आजी-आजोबा दिवसाचे आयोजन करण्यात आले. या वेळी घेण्यात
आलेल्या स्पर्धांमध्ये आजी-आजोबांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढविली.
शाळेच्या मुख्याध्यापीका अंजली उºहेकर आणि मनिषा पाटील, तसेच पर्यवेक्षीका मानसी कोकीळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन होऊन कार्यक्रमाला सुरूवात झाली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आजी-आजोबा दिवसाचे महत्त्व आणि गरज स्पष्ट करून सांगितली. त्यानंतर विद्यार्थी आणि उपस्थित
आजी-आजोबांनी विविध कलागुण सादर केले. विविध स्पर्धांमध्ये आजी-आजोबा उत्फुर्तपणे सहभागी झाले. विजेत्या स्पर्धकांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिवाय आजी-आजोबांना त्यांच्या नातवंडांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
शहिदांना श्रद्धांजली
जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे गुरूवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
आजी-आजोबा हवेतच!
प्रत्येकाच्या घरात आजी-आजोबा असणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे नातवंडांवर चांगले संस्कार होतात. त्यांना चांगल्या सवई लागतात. त्यामुळे उद्याचा नागरिक आपसुकच आदर्श घडला जातो, असे मत शाळा समितीचे अध्यक्ष व्ही.सी. म्हात्रे यांनी या वेळी व्यक्त केले.