अनाथ मुलीच्या विवाहाची जबाबदारी महापालिका स्वीकारणार, स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 02:30 AM2017-10-25T02:30:40+5:302017-10-25T02:31:11+5:30
नवी मुंबई : अनाथ मुलीच्या व आर्थिक दुर्बल घटकातील विधवा महिलेच्या पुनर्विवाहास ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत.
नवी मुंबई : अनाथ मुलीच्या व आर्थिक दुर्बल घटकातील विधवा महिलेच्या पुनर्विवाहास ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणा-यांना अनुक्रमे ५० व ३० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीअंतर्गत एकूण २७ प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पालिकेच्या योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेने अनाथ मुली व विधवा महिलांच्या पुनर्विवाहास अर्थसाहाय्य देण्याची योजना सुरू केली आहे. यापूर्वी ३५ हजार रूपये अनुदान दिले जात होते. यामध्ये वाढ करून ५० हजार रूपये करण्यात येणार आहे. अर्थार्जन करणारा कुटुंब प्रमुख मृत्यू पावल्यामुळे विधवा महिलांवर चरितार्थाचा प्रश्न निर्माण होत असतो. पुनर्विवाह केल्यास अशा महिलांचे पुढील आयुष्य सुरक्षित होते यामुळे महापालिकेने अनुदान सुरू केले आहे. याशिवाय अनाथ मुलींचे लग्न करताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने महापालिकेने ५० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठीही विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचण्या करणाºयांवरही कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय १ किंवा २ मुलींवर शस्त्रक्रिया करणाºया कुटुंबाला प्रोत्साहनपर अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे. १ मुलीवर शस्त्रक्रिया करणाºयांना ५० हजार रूपये व २ मुलींवर शस्त्रक्रिया करणाºयांना ३० हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.