शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

हरित न्यायाधिकरणाचे एमसीझेडएमएसह वन विभागाला अहवाल देण्याचे निर्देश

By नारायण जाधव | Published: December 01, 2023 3:22 PM

वादग्रस्त बालाजी मंदिर प्रकरण : मंदिर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रभागात असल्याचा पर्यावरणवाद्याचा आरोप

नवी मुंबई: नवी मुंबईच्याल उलवे येथील तिरुपती व्यंकटेश्वर स्वामी मंदिर प्रकल्पात होत असलेल्या सीआरझेड उल्लंघनांवर  पर्यावरणवाद्यांच्या याचिकेची दखल घेत, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) आणि  वन विभागास प्रकल्पाच्या बांधकाम स्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पर्यावरणवादी बी एन कुमार यांनी एनजीटीच्या पश्चिम पीठामध्ये याचिका दाखल केली. यामध्ये त्यांनी निदर्शनास आणून दिले की, मंदिरासाठी वाटप केलेला १० एकर भूखंड वास्तवामध्ये ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)च्या कास्टिंग यार्डसाठी तात्पुरत्या स्वरुपात भराव घातलेल्या भूभागाचा एक भाग आहे. या कास्टिंग यार्डसाठी १६ हेक्टर कांदळवनांची कत्तले केली आहेत. नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक असणारे कुमार पुढे म्हणाले, एमसीझेडएमएने या बाबीला लक्षात न घेत मंदिरासाठी अटीसहित परवानगी देण्याची शिफारस केली. एमसीझेडएमने नमुद केले आहे की एकूण ४०,००० चौ.मीटर (अंदाजे १० एकर) मंदिर भूखंडापैकी २७४८.१८ चौ. मीटर सीआरझेड १ए प्रभागात, २५,६५६.५८ चौ.मीटर सीआरझेड २ प्रभागात येत असून केवा ११,५९५ चौ.मीटर एवढा भूभाग सीआरझेडच्या बाहेर आहे. 

एमसीझेडएमएने सीआरझेड बाहेरील भूभागापर्यंत बांधकामाला मर्यादित करुन सशर्त मंजूरी दिली होती. परंतु राज्य पर्यावरण प्रभाव परिक्षण प्राधिकरण (एसइआयएए)कडून अनिवार्य असलेल्या मंजूरीचा कोणताही पुरावा नसण्याची बाब निवेदनकर्त्यांच्या वकील रोनिता भट्टाचार्य यांनी एनजीटी पीठाच्या निदर्शनास  आणली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच महिन्यांपूर्वी भूमीपुजन समारंभात हजेरी लावली होती. याचा अर्थ ही मंदिराच्या निर्माणाची अवैध सुरुवात आहे. भूखंडावर दोन हवन कुंडांची देखील निर्मिती केली होती. ऍडवोकेट भट्टाचार्य यांनी वन विभागाचा पाहणी अहवाल प्रस्तुत केला, ज्यामध्ये मंदिर भूखंडापासून ४२ मीटरमध्ये खारफुटींच्या अस्तित्वाला आणि मारेमारीच्या तळ्याला दाखवण्यात आले होते. अहवालामध्ये सदर भूखंडावर बांधकाम दिसत असल्याचे देखील नमुद करण्यात आले आहे.

हा युक्तीनाद ऐकून घेतल्यावर, जस्टिस दिनेश कुमार सिंग आणि तज्ञ सदस्य डॉ.विजय कुलकर्णी  यांचा समावेश असलेल्या पीठाने हे सांगितले की, बांधकाम सुरु झाले असण्याची पुष्टी करणे आवश्यक आहे. पीठाने त्यामुळे एमसीझेडएमए आणि वन विभागाला दोन आठवड्यांच्या आत  आपआपली प्रतिज्ञापत्रके सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी १२ जानेवारी २०२४ रोजी निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई